Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

India Squad for Ireland Tour:आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, हार्दिक पांड्या कर्णधारपदी

India Squad for Ireland Tour:आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, हार्दिक पांड्या कर्णधारपदी
, बुधवार, 15 जून 2022 (23:10 IST)
India Squad for Ireland Tour: आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बुधवारी (15 जून) बीसीसीआयने संघाची घोषणा केली. या मालिकेसाठी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यात आले आहे. टी-20 मध्ये तो भारताचा नववा कर्णधार असेल. 
 
त्याच्या आधी वीरेंद्र सेहवाग, एमएस धोनी, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन आणि ऋषभ पंत यांनी T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. पांड्या हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताचा 43 वा कर्णधार असेल.
 
सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनचे 17 सदस्यीय संघात पुनरागमन झाले आहे. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून चमकदार कामगिरी करणाऱ्या राहुल त्रिपाठीचा पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे.
 
राहुल त्रिपाठीने 14 सामन्यात 158.23 च्या स्ट्राईक रेटने 413 धावा केल्या. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
 
आयर्लंडविरुद्ध निवडलेल्या संघात दिनेश कार्तिक आणि भुवनेश्वर कुमार यांच्याकडे अधिक अनुभव आहे. कार्तिकने आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. 
 
भुवनेश्वरलाही अनुभव आहे, पण बीसीसीआय भविष्याचा विचार करत आहे. हार्दिकने आयपीएलमधील गुजरात टायटन्ससाठी पहिल्याच मोसमात ट्रॉफी जिंकून स्वतःला सिद्ध केले. या कारणांमुळे बोर्डाने त्याला कर्णधार बनवले.
 
आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ:हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आर बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
 
मालिकेसाठी आयर्लंड संघ: अँड्र्यू बालबिर्नी (कर्णधार), मार्क एडेअर, कर्टिस कान्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहेनी, जोश लिटल, अँड्र्यू मॅकब्राईन, बॅरी मॅककार्थी, कोनर ओल्फर्ट, पॉल स्टर्लिंग, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, क्रेग यंग .

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Father's Day Quotes In Marathi फादर्स डे साठी खास कोट्स