Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विराटला आले हसू!

विराटला आले हसू!
इन्दूर- भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि सहकार्‍यांनी नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडच्या संघाला 3-0 ने व्हाईटवॉश दिला. इन्दूर येथील अखेच्या सामन्यात विरोटच्या दमदार खेळीने सर्वत्र त्याचे कौतुक झालेच. मा‍त्र, त्याचबरोबर या सामन्यात विराटसारखाच हुबेहूब दिसणारा व्यक्ती पाहून अनेक क्रिकेट चाहतेही आश्चर्यचकित झाले.
 
विराटसारखा हुबेहूब दिसणार व्यक्ती यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित होता. त्यावेळी चाहत्यांनी तर अक्षरक्ष: त्याला विराट समजून त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली. हे सर्व पाहून ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या खराखुरा विराटला मात्र हसू आवरत नव्हते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कृषि विकास व शेतक-यांची यशोगाथा मांडणारा महोत्सव