Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

युवराज सिंगची पुन्हा एकदा फटकेबाजी पाहायला मिळणार

युवराज सिंगची पुन्हा एकदा फटकेबाजी पाहायला मिळणार
, सोमवार, 24 जून 2019 (10:02 IST)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या युवराज सिंगची पुन्हा एकदा फटकेबाजी पाहायला मिळणार असुउन, कॅनडा येथे होणाऱ्या ग्लोबल टी-20 लीगमधील टोरोंटो नॅशनल्स संघाचा युवीसोबत करार केला आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार आपल्या देशात सक्रीय खेळाडू परदेशातील ट्वेंटी-20 लीगमध्ये भाग घेऊ शकत नाही. त्यामुळेच युवीने आंतरराष्ट्रीय व स्थानिक क्रिकेटला रामराम केला होता. आता युवीने बीसीसीआयच्या  नियमांची पूर्ती केली आहे. त्यामुळे २६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या लीगमध्ये युवी २२ सामन्यात खेळनार आहे. युवीने परदेशी ट्वेंटी-20 मध्ये खेळण्यासाठी बीसीसीआयकडे पत्राद्वारे परवानगी मागितली होती.  टोरोंटो नॅशनल्ससह ग्लोबल टी-20 लीगमध्ये अजून पाच संघांचा समावेश आहे. यात व्हॅनकोव्हर नाईट्स, विनिपेग हॉक्स, एडमोंटोन रॉयल्स, माँट्रीअल टायगर्स, ब्रॅम्प्टन वोल्वेस यांचा समावेश आहे. युवराजसह पंजाबचा मनप्रीत गोनीही या लीगमध्ये खेळणार आहे. शिवाय युवीच्या संघात ब्रेंडन मॅकलम, किरॉन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्ट या दिग्गजांचाही समावेश आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उदयनराजे भोसले: मी राजीनामा देतो, पुन्हा निवडणुका घ्या