Publish Date: Sat, 12 Nov 2016 (12:21 IST)
Updated Date: Sat, 12 Nov 2016 (12:29 IST)
पाकिस्तानमध्ये सध्या एक चहावाला सर्वाधिक चर्चेत आहे. हा चहावाला त्याच्या निळ्या डोळ्यांमध्ये सर्वांचे, विशेषत: तरुणींचे लक्ष वेधून घेत आहे. त्याच्या निळ्या नजरेने पाकिस्तानातीलच नव्हे तर भारतातील मुलीही अक्षरश: घायाळ झाल्या आहेत. आता बॉलिवूडचा किंग खान शाहरुखलाही याची भुरळ पडली आहे. अर्शद खान असे या तरुणाचे नाव आहे. अर्शद शाहरुखचा जबरा फॅन आहे. ही गोष्ट शाहरुखला समजल्यावर त्यानेही अर्शदच्या डोळ्यांचे कौतुक केले आहे.