Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

International Beer Day 2023 बिअरबद्दल रोचक तथ्य

Webdunia
International Beer Day 2023 दरवर्षी ऑगस्टच्या पहिला शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बिअर दिवस साजर करण्यात येतो. ह्यावर्षी हा 4 ऑगस्ट रोजी येईल. आंतरराष्ट्रीय बिअर दिवस साजर करण्यामागील कारण म्हणजे ह्यामुळे आपण आपल्या मित्रांशी मिळून बैठक करू शकतो, बिअर सर्व्ह करणार्‍यांच्या कार्याचे कौतकु करु शकतो आणि हा दिन साजर करत ह्या बहाण्याने जगात असलेले देश किंवा संस्कृतीला सोबत आणू शकतो. हा दिवस साजर करण्याचे असे अनेक कारणं असले तरी चला जाणून घेऊया बिअरबद्दल काही रोचक तथ्य :-
 
• आंतरराष्ट्रीय बिअर दिवस पहिल्यांदा 2007 मध्ये कॅलिफोर्नियाच्या सांता क्रुझ येथे साजर करण्यात आला होता.
 
• 2007 ते 2012 पर्यंत हा दरवर्षी 5 ऑगस्ट रोजी साजर करण्यात आला पण नंतर बहुमताचे निर्णयानुसार ह्याला ऑगस्टच्या पहिला शुक्रवारी साजर करण्यात येतं.
 
• प्राचीन इराणमध्ये सापडलेले प्राचीन रासायनिक अवशेषांद्वारे हे माहीत पडलं की बिअर 3500-3100 BC तेव्हा देखील बनवली जात होती. अवशेषांनुसार तेव्हा  बार्लीपासून बिअर तयार केली जात असायची.
 
• बिअर सगळ्यात जुन्या पेय पदार्थांपैकी आहे आणि ही पाणी आणि चहा यानंतर जगात तिसरी सगळ्यात अधिक सेवन केले जाणारे पेय आहे.
 
• बिअरमध्ये सगळ्यात कमी अल्कोहोल असतं. सामान्यतः ह्यात 2 - 8 % व्हॉल्यूमनुसार अल्कोहोल असतं. जगातली सगळ्यात स्ट्रॉंग बिअरमध्ये व्हॉल्यूमनुसार 67.5 % अल्कोहोल आहे.
 
• जगातली सगळ्यात स्ट्रॉंग बिअर 'स्नेक वेनम (Sanke Venom)' ह्यामध्ये व्हॉल्यूमनुसार 67.5 % अल्कोहोल असतं. ही बिअर 2013 मध्ये स्कॉटिश ब्रुअरी ब्रुअमिस्टर यांनी तयार केली होती.
 
• ही मुख्यत: धान्यांपासून बनवलेल्या पदार्थांपासून, किंवा स्टार्च ह्याने तयार केली जाते. सामान्यतः माल्ट केलेले बार्ली, जरी गहू, मका (कॉर्न), तांदूळ आणि ओट्स देखील वापरतात.
 
• 2011 पर्यंत रशियामध्ये बिअरला अल्कोहोलिक पेय मानले जात नव्हते.
 
• ‘सेनोसिलिकाफोबिया’ हा रिकाम्या बिअर ग्लासचा फोबिया आहे.
 
• जगातील सर्वात जुना अन्न सुरक्षा कायदा जर्मनच्या REINHEITSGEBOT अजूनही अस्तित्वात आहे. ह्यावर्षी ह्या कायद्याचे 500 वर्ष होत असून याप्रमाणे जर्मन बिअर ब्रुअर्स फक्त चार पदार्थ बिअर बनवण्यासाठी वापरू शकतात : माल्ट, हॉप्स, यीस्ट आणि पाणी.
 
• सर्वात जलद 1 लिटर बिअर पिण्याचं जागतिक रेकॉर्ड 1.3 सेकंद आहे.
 
• नॉर्वेमधील पहिल्या विमान अपहरणच्यावेळी अपहरणकर्त्याने बिअरच्या बदल्यात आपले शस्त्राचे आत्मसमर्पण केले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

ठाणे : वेश्याव्यवसायात अडकल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल, तरुणीची सुटका

नौदलाच्या पाणबुडीला मासेमारीची बोटची धडक दोघांचे मृतदेह बाहेर काढले

LIVE: महाराष्ट्रातील वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मागे घेतला

महाराष्ट्रातील वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मागे घेतला

पुढील लेख
Show comments