Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सावित्रीबाई फुले यांची एक छान कविता...

सावित्रीबाई फुले यांची एक छान कविता...
, शनिवार, 2 जानेवारी 2021 (11:22 IST)
तयास मानव म्हणावे का?
ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
बुद्धी असुनि चालत नाही
तयास मानव म्हणावे का?
दे रे हरी पलंगी काही
पशूही ऐेसे बोलत नाही
विचार ना आचार नाही
तयास मानव म्हणावे का?
पोरे घरात कमी नाहीत
तयांच्या खाण्यासाठीही
ना करी तो उद्योग काही
तयास मानव म्हणावे का?
सहानुभूती मिळत नाही
मदत न मिळे कोणाचीही
पर्वा न करी कशाचीही
तयास मानव म्हणावे का?
दुसऱ्यास मदत नाही
सेवा त्याग दया माया नाही
जयापाशी सदगुण नाही
तयास मानव म्हणावे का?
ज्योतिष रमल सामुद्रीकही
स्वर्ग नरकाच्या कल्पनाही
पशुत नाही त्या जो पाही
तयास मानव म्हणावे का?
बाईल काम करीत राही
एेतोबा हा खात राही
पशू पक्षात एेसे नाही
तयास मानव म्हणावे का?
पशु-पक्षी माकड माणुसही
जन्ममृत्यु सर्वा नाही
याचे ज्ञान जराही नाही
तयास मानव म्हणावे का?

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोहन भागवत म्हणाले- हिंदू कधीही भारतविरोधी असू शकत नाही, ओवेसींनी विचारले- गोडसे कोण होते ?