Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 7 April 2025
webdunia

४५० हुन अधिक विद्यार्थी आणि शामक दावर व्हिक्टरी आर्ट फाउंडेशनने साजरा केला जागतिक अपंगत्व दिन.!

Victory Presentation
मुंबई , शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019 (12:22 IST)
निष्णात आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आणि व्हिक्टरी आर्ट्स फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने शामक दावर यांचे वार्षिक सादरीकरण सेंट अ‍ॅन्ड्र्यूज सभागृहात केले. जागतिक अपंगत्व दिनाच्या निमित्ताने विशेष मुलांच्या भावविश्वात सामील झाले, व्हिक्टरी आर्ट्सच्या सादरीकरणाने वेगवेगळ्या वयोगटातील, लिंग, जाती, वर्ग यांच्या ४५० हुन अधिक, कोणताही पूर्वग्रह न ठेवता एकत्र येत सादरीकरण केले.
 
व्हिक्टरी आर्ट्स फाउंडेशन ही एक एनजीओ आहे, ज्यात बौद्धिक अपंगत्व असलेल्या मुलांसह डाउन सिंड्रोम, सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम, व्हीलचेयर वापरणार्‍या व्यक्ती, क्रॉच आणि कॅलिपर, व्हिचुअल कमजोरी असलेल्या व्यक्ती, श्रवण क्षमता कमी असलेल्या व्यक्ती, भावनिक आघात झालेल्या मुलांसह कार्य करते (अनाथ आणि बाल मजूर), बांधकाम कामगारांची मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला/ मुले जे मानवी तस्करीला बळी पडतात आणि घरगुती हिंसाचाराचा बळी पडतात किंवा आजाराने ग्रस्त मुले आणि प्रौढ (कर्करोग, स्किझोफ्रेनिया आणि एचआयव्ही संक्रमित), कायद्याशी संघर्ष करणारे मुले आणि प्रौढ यांच्यासाठी काम करते. 
webdunia
या सादरीकरणात १४ स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेत शोमध्ये सादर केलेल्या नेत्रदीपक कामगिरीची नोंद केली. वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांमधील सर्व मुलांना शामकच्या उत्कृष्ट नृत्य विद्याशाखेतर्फे प्रशिक्षण देण्यात आले होते. या कामगिरीने प्रेक्षकांवर मंत्रमुग्ध करणारा प्रभाव पाडला; प्रेक्षकांनी विशेष मुलांना प्रोत्साहित केले.   
 
“ नृत्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही आणि लोकांना हे हि माहित नाही की नृत्यात बरे करण्याची क्षमता असते, ते खरोखर मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक आणि भावनिकरित्या प्रत्येक स्तरावर बरे होते. आणि हेच आपल्याला बदलायचे आहे. सुमारे ३० वर्षांपूर्वी जेव्हा मी नुकताच माझा वर्ग सुरू केला तेव्हा पोलिओ ग्रस्त मुलगी माझ्याकडे आली आणि मला सांगितले की तिला माझ्या वर्गात यायचे आहे. ती पायही हलवू शकत नाही हे जाणून घेतल्यानंतर मी तिला ताबडतोब माझ्या वर्गात दाखल करण्यास सांगितले. तिने एक वर्ष पूर्ण केल्यावर ती मला म्हणाली, “तुम्हाला माहिती आहे का माझे डॉक्टर मला म्हणाले कि तुझे हात हलणार नाहीत त्यापेक्षा जास्त हलत आहेत.” हा चमत्कार आहे, ज्यामुळे मला असे वाटते की नृत्य खरंच एखाद्या व्यक्तीबरोबर असे करू शकते. शामक दावर म्हणतात, “व्हिक्टरी आर्ट फाउंडेशन’ने सुरू केली, ही कल्पना माझ्या अंतःकरणाच्या अगदी जवळ आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ठाकरे सरकारमधील सहा मंत्र्यांचा परिचय