Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नागरी सहकारी बँकांची ऑनलाईन पद्धतीने नोकरभरती

नागरी सहकारी बँकांची ऑनलाईन पद्धतीने नोकरभरती
, मंगळवार, 22 जानेवारी 2019 (10:01 IST)
राज्यातील सर्व नागरी सहकारी बँकांनी स्टाफिंग पॅटर्न निश्‍चित करावा. सोबतच बॅकांनी ऑनलाईन पद्धतीने नोकरभरती प्रक्रिया राबविणे बंधनकारक आहे व या नोकरभरतीसाठी त्रयस्थ संस्थेची नियुक्‍ती करावी,  असा शासन आदेश राज्याच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने  काढला आहे. याबाबत परीपत्रक काढण्यात आले आहे.  
 
‘ राज्यातील काही बँकांनी यापूर्वी स्टाफिंग पॅटर्न निश्‍चित करून सेवकभरती प्रक्रिया राबविलेली आहे, अशी भरती प्रक्रिया राबवित असताना ऑफलाईन पद्धतीने परीक्षा व परीक्षोत्तर टप्प्यात बँकांच्या संदर्भात काही गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशीअंती भरती प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने झाली नाही. या सदोष भरती प्रक्रियेचा बँंकांच्या प्रशासनावर अनिष्ठ परिणाम होऊन बँकेवर विश्‍वास ठेवून गुंतवणूकदारांच्या,  ठेवीदारांच्या हितास बाधा पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकहितासाठी व बँकांचे कामकाज कार्यक्षम चालविण्यासाठी पारदर्शक, नि:पक्ष भरती प्रक्रिया राबविणे अत्यावश्यक आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जाणून घ्या डाव्या कुशीवर झोपण्याचे 7 फायदे