Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्लॉकचेन तंत्रज्ञानावरील कोर्ससाठी जेटकिंग आणि NEAR प्रोटोकॉल यांची भागीदारी!

ब्लॉकचेन तंत्रज्ञानावरील कोर्ससाठी जेटकिंग आणि NEAR प्रोटोकॉल यांची भागीदारी!
मुंबई , मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (18:32 IST)
उच्च पगाराच्या ब्लॉकचेन नोकऱ्यांचे १ लाख तरुणांसाठी ६० मिनिटांचे विनामूल्य प्रशिक्षण शिबीर
 
जेटकिंग इन्फोट्रेन या भारतातील पब्लिक लिमिटेड कंपनीने NEAR प्रोटोकॉलसोबत आपली भागीदारी जाहीर केली आहे. नियर प्रोटोकॉल एक ओपन-सोर्स प्लॅटफॉर्म आहे जे क्रिएटर्स, कम्युनिटीज आणि मार्केट्स यांना अधिक ओपन,  इंटर्कनेक्टेड आणि ग्राहक-सक्षम जग याचे संचालन करण्यास सक्षम बनवते.
 
ब्लॉकचेन टेकवरील प्रशिक्षकांच्या नेतृत्वाखालील प्रत्येक फाउंडेशन कोर्स राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कने मंजूर केलेल्या उद्योग-चालित सर्वसमावेशक अभ्यासक्रमावर आधारित आहे. जेटकिंग आणि NEAR प्रोटोकॉलने विकसित केलेला कोर्स उद्योगातील उच्च प्रशिक्षित ब्लॉकचेन तज्ञांद्वारे थेट ऑनलाइन वितरित केला जाईल. हे आयटी डोमेनमधील सर्वात लोकप्रिय तंत्रज्ञान आहे आणि जेटकिंग सध्या डोमेनच्या औद्योगिक टप्यावर आहे, जेथे प्लॅटफॉर्म तयार केले जात आहेत आणि नवनवीन कंपन्या शोधत आहेत. म्हणून, डोमेन करिअर म्हणून ब्लॉकचेन निवडणे ही सर्वोत्तम निवड  ठरणार आहे.
webdunia
जेटकिंग इन्फोट्रेनने तयार केलेला अभ्यासक्रम १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानावरील १८० मिनिटांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात मोफत प्रवेश मिळवून देईल. याद्वारे ते विद्यार्थी, फ्रँचायझी, रिक्रूटर्स आणि गुंतवणूकदारांसाठी चांगले जीवनमान तयार करण्यास मदत करतील.
 
मोफत कोर्समध्ये ब्लॉकचेनची ओळख करून देण्यात येणार आहे आणि भारतातील ब्लॉकचेनचे भविष्य काय असेल आणि ते त्यांना कशा पद्धतीने मदत करेल याची माहिती देण्यात येईल.  NEAR हे एक विकेंद्रित ऍप्लिकेशन प्लॅटफॉर्म आहे जे पैसे किंवा आयडेंटिटी यांसारख्या मौल्यावान दैनंदिन व्यवहारातील गोष्टींचे व्यवस्थापन करण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आणि उपयुक्त असून, ओपन वेबची शक्ती त्यांच्या हातात देते. या भागीदारीमुळे, जेटकिंग आपल्या विद्यार्थ्यांना नामांकित नोकरी मिळविण्यासाठी सक्षम करते, कारण भारतात ब्लॉकचेनचे भविष्य झपाट्याने वाढत आहे.
 
अलीकडील आकडेवारीनुसार, 56% भारतीय व्यवसाय ब्लॉकचेन तंत्रज्ञानाकडे वळत आहेत, ज्यामुळे तंत्रज्ञानाला त्यांच्या व्यवसायाचा मुख्य भाग बनवले जात आहे. उद्योगानुसार, ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये भारतात मोठ्या प्रमाणावर अनुप्रयोग आहेत. त्यासोबतच, क्रिप्टोकरन्सी मार्केट २०१९ ते २०२६ पर्यंत CAGR ३०% वाढणार आहे,  जे २०१९ मध्ये $७९२.५३ अब्ज होते ते २०२६ मध्ये $५१९०.६२ अब्ज असेल.
 
हर्ष भारवानी, सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक, “ब्लॉकचेनसाठी बाजारपेठेचा आकार वाढत असल्याने, २०२६ पर्यंत ते सुमारे $७२ अब्जपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे, जेटकिंगमध्ये आम्ही याला एक वाढता ट्रेंड म्हणून पाहतो, जे संपूर्ण  यंत्रणांमध्ये समाविष्ट केले जाईल. आणि म्हणूनच, आम्ही अर्थव्यवस्थेसाठी रोजगार आणि संधी निर्माण करत आहोत. NEAR सोबतच्या या भागीदारीद्वारे, आम्ही कामाच्या विविध क्षेत्रांमध्ये वाढ आणि नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची अपेक्षा करत आहोत.”
 
शेरीफ अबुशादी, शिक्षण प्रमुख, NEAR प्रोटोकॉल, “NEAR जगाकडे एका उद्दिष्टाने पाहतो जिथे लोक त्यांचे पैसे, डेटा आणि ओळख नियंत्रित करू शकतात. या भागीदारीद्वारे, NEAR हे आमच्या सुरक्षित आणि कौशल्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून हे शक्य आणि सोपे करू शकते”.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मस्करा लावण्याची योग्य पद्धत, या टिप्स फॉलो करा