लग्नप्रसंगी वेगवेगळ्या प्रकारचे पेहराव केले जातात. महिलांकडे तर प्रावरणांचे असंख्य पर्याय असतात. अगदी साडीपासून इव्हिनिंग गाऊनपर्यंत बरंच काही कॅरी केलं जातं. सध्या शरारा कुर्ता हा प्रकार चांगलाच इन आहे. बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्रीही या लूकमध्ये मिरवताना दिसतात. तुम्हालाही लग्नप्रसंगी शरारा कुर्ता घालायचा असेल तर या टिप्स फॉलो करता येतील.
* माधुरी दीक्षितने मध्यंतरी पिवळ्या रंगाचा शरारा कुर्ता घातला होता. हा पेहराव हळदीच्या प्रसंगी करता येईल. माधुरीने या शरारा कुर्त्यावर ऑरगेंझा दुपट्टा घेतला असून हेवी चोकर सेटने आपला लूक खुलवला आहे. तुम्ही अशा पद्धतीने नटू शकता.
* अभिनेत्री आमना शरीफनेही आयव्हरी आणि गुलाबी रंगाचं कॉम्बिनेशन असणारा शरारा कुर्ता घातला होता. यावर तिने स्टेटमेंट कानातले घातले आहेत. अशा शरारा कुर्ता तुम्ही लग्नप्रसंगी घालू शकता.
* वेगळ्या स्टाईलसाठी शरारा आणि क्रॉप टॉप किंवा शॉर्ट कुर्ती घालता येईल. शिल्पा शेट्टीने निळ्या रंगाच्या शरार्याावर त्याच रंगाची अंगरखा स्टाईल शॉर्ट कुर्ती घातली होती. हा लूकही क्लासिक होता.
* शरारा कुर्ताचा दुपट्टाही वेगळ्या पद्धतीने ड्रेप करा. गौहर खानने पिस्ता रंगाचा शरारा कुर्ता घातला होता. अशा भरपूर नक्षीकाम असणार्या शरारा कुर्त्यावर दुपट्टा ड्रेप करताना ड्रेसवरचं नक्षीकाम लपणार नाही याची काळजी घ्या.