ज्येष्ठ शुद्ध दशमीला गंगा दशहरा साजरा केला जातो. या दिवसी गंगा नदीचे अवतरण भारत भूमीवर झाले होते असे मानले जाते. या संवत्सरमुखी तिथी बाबत स्कंद पुराणात उल्लेख असल्याचे आढळून येतं. अशी मान्यता आहे की गंगा नदीत स्नान केल्याने सर्व पापातून मुक्ती मिळते.
या दिवशी काय करावे-
या दिवशी गंगा स्नान करणे पवित्र मानले गेले आहे. असे करणे शक्य नसल्यास घरातील पाण्यात गंगा जलाचे थेंब मिसळून स्नान करावे.
या दिवशी गंगा पूजन करावे.
गंगा पूजन करताना ॐ श्री गंगे नमः आणि ॐ नमो गंगायै विश्वरूपिण्यै नारायण्यै नमो नमः या मंत्रांचा जप करावा.
गंगा पूजन झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे.
या दिवशी दान करण्याचे महत्त्व आहे.
या दिवशी दिलेले दान दुपटीने आपल्याला पुन्हा येतं असे म्हटले जाते.
या दिवशी जावयांना आंब्याचे वाण देण्याची परंपरा देखील आहे.