कित्येकदा आम्ही लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि नंतर कळतं की तो व्यक्ती साफ खोटं बोलत होता. याने आपले संबंध तर खराब होतातच वरून मानसिक भावनादेखील दुखावल्या जातात. नंतर आपली फसवणूक झाली ही भावना मनात घर करत राहते. या सर्वांपासून वाचण्यासाठी आपल्या थोडेसे स्मार्ट होण्याची गरज आहे. समोरच्याचे हाव-भाव आणि आवाजावरून आपण ठरवू शकतो की समोरच्या व्यक्ती खोटं बोलतं आहे की खरं. हे ओळखण्यासाठी वाचा काही टिप्स:
* खोटं बोलणारा व्यक्ती सहसा नजर मिळवून बोलत नाही.
* खोटं बोलणारा मोठ्याने नाही तर गुळूगुळू करून आपली गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो. कित्येकदा अश्यागोष्टींचा प्रसंग जुळून येत नाही.
* खोटारडा हसतानाही खळखळून हसत नाही.