Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तर या कारणांनी जन्माला येतात किन्नर (षंढ)

kinnar
प्रकृतीत नर नारी शिवाय एक अजून वर्ग आहे जो न पूर्ण नर असतो आणि नाही नारी. अशा लोकांमध्ये जननांग विकसित होत नाही, पुराणात यांना षंढ म्हणून संबोधित करण्यात आले आहे. पौराणिक कथेत बर्‍याच क‌िन्नरांचा उल्लेख करण्यात आला आहे. महाभारतात  भीष्मच्या मृत्यूचे कारण एक क‌िन्नरला सांगण्यात आले आहे ज्याचे नाव शिखंडी होते. अर्जुन पुरुष असूनही काही काळासाठी नपुंसक झाले होते. पण आता प्रश्न असा येतो की स्‍त्री पुरुषामध्ये एक वेगळा वर्ग कसा जन्म घेऊ शकतो. या विषयावर ज्योत‌िषशास्‍त्र आणि पुराण काय म्हणतात जरा बघूया.
webdunia
ज्योत‌िषशास्‍त्रानुसार जन्मपत्रिकेच्या आठव्या घरात शुक्र आणि शनी उपस्थित असेल आणि यांच्यावर गुरू, चंद्राची दृष्टी पडत नसेल तर अशा परिस्थितीत व्यक्ती नपुंसक असू शकतो.    
 
कुंडलीत ज्या घरात शुक्र बसला असेल त्यापासून सहाव्या किंवा आठव्या घरात शनी असेल तर व्यक्तीत प्रजनन क्षमतेची कमतरता असू शकते. जर एखाद्या शुभ ग्रहाची दृष्टी पडत असेल तर या समस्येपासून बचाव होऊ शकतो.
webdunia
जन्माच्या वेळेस कुंडलीत शनी सहाव्या किंवा बाराव्या घरात कुंभ किंवा मीन राशीत असेल आणि कुठलाही शुभ ग्रहाची शनीवर दृष्टी पडत नसेल तर व्यक्तीत प्रजनन क्षमता कमी होते आणि व्यक्ती क‌िन्नर असू शकतो.  
 
मेष, मिथुन, सिंह, तुला, धनू, कुंभ लग्न असेल आणि वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर, मीन राशीत मंगळ असेल आणि याची दृष्टी लग्न स्थान अर्थात पहिल्या घराच्या स्वामीवर असेल तर व्यक्तीचे जननांग अविकसित असू शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

10 चमत्कारी नमस्कार मंत्र, ‍जे देतील अफाट धन- संपत्ती