Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कपाळावर हळदीचा टिळा लावल्याने खुलतं भाग्य

Hindu tilak style
, बुधवार, 2 नोव्हेंबर 2022 (16:29 IST)
हिंदू धर्मातील कोणत्याही शुभ कार्याला जाण्यापूर्वी कपाळावर टिळक लावण्याची परंपरा आहे. कपाळवर तिलक करणे शुभ मानले जाते. शास्त्रांप्रमाणे कार्यात निश्चित यश मिळवण्यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी तिलक केलं जातं.
 
या व्यतिरिक्त ही कपाळावर टिळक लावणे अनेक प्रकारे फायदे आहे. टिळक प्रामुख्याने कपाळावर का लावले जातात आणि त्याचे काय फायदे आहेत हे जाणून घेऊ या- 
 
तिलक करणे एक महत्त्वाचा विधी मानला जातो. कोणत्याही शुभ कार्यासाठी जात असताना किंवा कोणत्याही मांगलिक पूजेसाठी कपाळावर टिळक लावल्याने खूप शुभ फळ मिळतं. टिळक हे कपाळाच्या मध्यभागी लावलं जातं. तिलक हे रोळी, चंदन, केशर, तर हळद यापैकी असू शतं. सर्व प्रकारचे टिळक लावण्याचे आपले महत्त्व आहे. पण या सगळ्यांपैकी हळदीच्या टिळकांचे स्वतःचे वेगळे फायदे आहेत.
 
हळदीचे टिळक लावण्याचे फायदे
ज्योतिषशास्त्रात नवग्रहांना वेगळे स्थान आणि महत्त्व आहे. हळद बृहस्पतिचा कारक मानली जाते. हळद पिवळ्या रंगाची असून ती गुरू ग्रहावर नियंत्रण ठेवते. त्यामुळे कपाळावर हळदीचा तिलक लावणे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रात बृहस्पतिला सर्वोच्च दर्जा आहे. हा गुरू ग्रह नियंत्रित करतो. असे मानले जाते की बृहस्पति चांगला असेल तर आपले नशीब चांगलं असतं आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्यात कपाळावर हळदीचा तिलक लावल्याने ते कार्य यशस्वीपणे पूर्ण होण्यास मदत होते.
 
हळदीने बृहस्पतिचे हानिकारक प्रभाव दूर होण्यास मदत होते
जर बृहस्पति कोणत्याही व्यक्तीसाठी अशुभ असेल तर हळदीच्या तिलकाने त्याचा प्रभाव सकारात्मक होतो. बृहस्पति कोणत्याही राशीसाठी शुभ असेल तर हळदीचा टिळक अधिक शुभ बनवतो. हे तिलक कपाळाच्या मध्यभागी लावणे शुभ असते. अशात जेव्हा ही कोणत्याही शुभ कार्यासाठी जात असाल तर यशासाठी कपाळावर हळदीचा टिळक लावावा.
 
हळदीचे तिलक केल्याने करिअर आणि व्यवसायात लवकरच यश गाठता येतं. गुरूची अशुभ दशा संपवायची असेल तर कपाळावर हळदीचा तिलक लावावा. काही दिवसात तुम्हाला त्याचे फायदे दिसतील.
 
कपाळाच्या मध्यभागी टिळक लावण्यामागील कारण
शरीरात सात ऊर्जा केंद्रे आहेत ज्यांना शक्तीचे भांडार देखील मानले जाते. कपाळाच्या मध्यभागी आज्ञा चक्र आहे आणि ते सात चक्रांपैकी सर्वात महत्वाचे आहे. या चक्रात शरीराच्या तीन नाड्या एकत्र येतात. त्यामुळे शरीरातील सर्वात महत्त्वाचे स्थान असल्याने आज्ञा चक्राला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. याकरिता मध्याभागी तिलक करतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल 02.11.2022