Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आपले अनिष्ट ग्रह बदलायचे असेल ते हे करून बघा...

आपले अनिष्ट ग्रह बदलायचे असेल ते हे करून बघा...
, बुधवार, 13 जानेवारी 2021 (15:51 IST)
ग्रहांचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी शास्त्रांमध्ये शांतीस महत्त्व दिले आहे. यामुळे परिस्थितीत बदल होवून परिवर्तन होवू शकते. प्रत्येक व्यक्तीने आपल्या राशीनुसार हे काम केल्यास लाभ मिळण्याची शक्यता अधिक आहे.
 
सध्याच्या काळात मेष या राशीला मंगळ, राहू आणि बुध हे ग्रह प्रतिकूल आहेत. गणेश आराधना, गणपती अथर्वशीर्षचा जप, खरे बोलणे आणि कार्यात स्पष्टता ठेवल्यास काम सोपे होईल. या व्यक्तींनी हिरवे कपडे परिधान करू नये. 
 
वृषभ राशीतील लोकांना गुरू, शुक्र, शनी, राहुची स्थिती अनुकूल नाही. यासाठी गुरूचा आशीर्वाद, साधी राहणी, लहान गोष्टींना महत्व देणे, दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्यास कामे सोपे होतील. काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये. 
 
मिथून राशीच्या व्यक्तींना रवी, राहु, केतूमुळे यशात अडचण येऊ शकतात. यामुळे यश मिळविण्यासाठी विष्णू सहस्त्रनामाचा जप, नारायण कवचाचा पाठ, सूर्यादयापूर्वी स्नान, कोणत्याही कामातील प्रयत्नांत वाढ, शारीरिक शुद्धी कायम ठेवणे आणि व्यसनापासून लांब राहाणे हे उपाय आहेत. डिझाइनचे कपडे परिधान करू नयेत. 
 
कर्क राशीत रवी, मंगळ, राहू या ग्रहांची विपरित स्थिती आहे. यासाठी ब्रह्यचार्याचे पालन, गायत्री देवीची उपासना करावी. 
 
सिंह राशीतील लोकांनी बुध, केतू, शनीची प्रतिकूलता कमी करण्यासाठी भगवान शंकराचे पूजन करावे. आळस करू नये. दुसर्‍यांच्या विश्वासावर कार्य करू नये. दान जास्तीत जास्त करावे. चामड्याच्या वस्तूंचा त्याग करावा.
 
कन्या राशीत रवी, राहु प्रतिकुल असल्याने मारूतीची उपासना करावी. सांयकाळच्या वेळेस महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. प्रवास कमीत कमी करावा. सर्वांना नेहमी मदत करावी. महागडी वस्त्रे परिधान करू नयेत.
 
तुळ राशीच्या लोकांनी रवी, मंगळ, गुरू आणि केतू यांना अनुकूल करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाची आराधना करावी. व्यवहारात संयम पाळावा. आपला दबाव पूर्ण राहू द्यावा. लाल कपडे परिधान करु नये. 
 
वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी मंगळ, शुक्र यांची प्रतिकूलता कमी करण्यासाठी भगवान विष्णूची पूजा करावी. विपरीत लिंगाच्या व्यक्तींबाबत सतर्क राहावे. आळस सोडावा. संपूर्ण पांढरे कपडे परिधान करू नये. 
 
धनू राशीतील व्यक्तींनी गुरु, मंगळ आणि शनीच्या शांतीसाठी गणपती व मारूतीची उपासना करावी. कार्य वेळेवर व योग्य मार्गदर्शन घेऊनच करावे. पिवळे कपडे व चामड्यांच्या वस्तूंचा त्याग करावा.
 
मकर राशीत गुरू, राहु, केतू यांच्या शांतीसाठी दुर्गा सप्तशतीचे अनुष्ठान करावे. साधू-संतांचे आशीर्वाद घ्यावेत. अनिश्चिततेचा त्याग करावा. रंगबिरंगी कपडे परिधान करू नये.
 
कुंभ राशीत शनी, बुध, शुक्र या ग्रहांना प्रतिकूल करण्यासाठी भगवान शंकर आणि विष्णूची आराधना करावी. आपले कार्य शांततेने करावे. आपल्या आश्रितांच्या सल्ल्यांवर लक्ष ठेवावे. हिरवे कपडे परिधान करू नये.
 
मीन राशीतील व्यक्तींनी मंगळ, केतूची शांती करावी. यासाठी देवीची उपासना, पितरांची उपासना करावी. आपल्या कार्यात वेग आणावा. सूर्यादयापूर्वी उठावे. लाल रंगाच्या कपड्यांचा त्याग करावा. या उपायांशिवाय आपल्या स्वता:च्या ग्रहांचा विचार करावा. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Jupiter Combust 2021: मकर संक्रांतीनंतर गुरू अस्त होत आहेत, हे जाणून घ्या आपल्या आयुष्यावर त्याचा कसा परिणाम होईल