please your husband do these two things पहिले काम म्हणजे जर तुम्ही पतीच्या इच्छेनुसार वागल्यास तर पतीच्या मनामत पत्नीसाठी एवढे प्रेम निर्माण होते जेवढे एखाद्या रंगरूप, यौवन आणि दागिन्यांनी सजलेल्या शरीराकडे पाहूनही होत नाही.
याचा अर्थ असा की कोणतीही सौंदर्यहीन स्त्री देखील पतीच्या मनामध्ये स्वतःचे स्थान निर्माण करू शकते, याउलट एखादी स्त्री सुंदर पतीच्या विरोधात वागत असेल तर तिला पतीपासून दुःखच मिळते.
आता दुसरे काम म्हणजे - स्त्रीने आपले तन, मन, विचार, चारित्र्य एक मौल्यवान दागिना समजून जन्मभर त्याची चमक आणि पवित्रता कायम ठेवायला पाहिजे. कारण कुटुंब, कुळाच्या प्रतिष्ठेसाठी स्त्रीने योग्य आचरणात राहून गृहस्थ जीवन व्यतीत केल्यास तिला कुटुंब, समाजात मान-सन्मान, प्रतिष्ठा तसेच पतीचे सुख प्राप्त होते.
त्याउलट वाईट संगतीमध्ये राहणारी, मनमानी करणारी, कोणाच्याही घरी केव्हाही जाणारी, नेहमी झोपून राहणारी, मोठ्यांचा अनादर करणारी स्त्री कधीही सुखी राहू शकत नाही आणि पतीव घराच्या सदस्यांनाही आनंदी ठेवू शकत नाही.