Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या लोकांसाठी प्रेम व्यक्त करणे अती अवघड

या लोकांसाठी प्रेम व्यक्त करणे अती अवघड
प्रेम करणे कठिण असले तरी त्याहून अवघड आहे स्वीकारणे. परंतू अधिक अडचण तेव्हा येते जेव्हा प्रेम असलं तरी व्यक्त करता येत नाही. काही लोकांना प्रेम व्यक्त करणे देखावा वाटत असलं तरी त्यांना आपले विचार बदलायला हवे. प्रेम व्यक्त केल्याने नात्यात मजबुती येते. आपणही आपल्या जवळपास असे लोकं नक्कीच बघितले असतील ज्यांना प्रेम व्यक्त करता येत नसेल जाणून घ्या असे कोणत्या राशीचे जातक आहेत ज्यांना आय लव्ह यू म्हणता येत नाही... 
 
मिथुन
मिथुन रास असलेल्या जातकांना जीवनात नवीन प्रयोग करायला आवडतात. अर्थात ते नवीन लोकांना भेटतात, त्यांना जवळून जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आणि कोणासोबत पटू शकत हे समजून घेतात. या व्यतिरिक्त स्वत:ला आवश्यक वाटत असलेल्या कसोटीवर तपासून बघतात. अशामुळे स्वत:ला खात्री पटत नाही तोपर्यंत ते कुणासमोरही प्रेम व्यक्त करायला तयार नसतात.
 
कन्या
कन्या रास अत्यंत प्रोफेशनल लोकांची रास असते. पर्फेक्शन ही त्यांची कमजोरी असते. आणि अशा स्वभावामुळेच जोपर्यंत हृदयापासून कोणी आवडत नाही तोपर्यंत प्रेम व्यक्त करणे अत्यंत कठिण जातं.
 
वृश्चिक
वृश्चिक राशीचे लोकं परिवर्तन लवकर स्वीकार करू पात नाही. ते प्रत्येक गोष्टीला भविष्याशी जोडून बघतात. म्हणूनच प्रेमाच्या बाबतीत पूर्ण वेळ घेतात आणि स्वत:चा ठामपणे निर्णय होत नाही तोपर्यंत यांच्या तोंडून आय लव्ह यू निघू शकत नाही.
 
मकर
मकर राशीचे लोकं व्यावहारिक, महत्त्वाकांक्षी आणि लक्ष्य प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतात. हे लोकं केवळ आपल्या कामावर केद्रिंत असतात. हे इतर लोकांच्या दिसण्याची, व्यवहाराची आणि कामाची प्रशंसा करतात. हे लोकांना स्वत:च्या हृद्यात जागा देतात परंतू व्यावसायिक आणि व्यावहारिक नात्याव्यतिरिक्त पर्सनल रिलेशनमध्ये यांना तेवढा रस नसतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कमी लोकांच्या हातात असतो जादुई क्रॉस, आपले हात बघा आणि जाणून घ्या भाग्य