Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आहारात रंगीबिरंगी भाज्या, फळे खा!

आहारात रंगीबिरंगी भाज्या, फळे खा!

वेबदुनिया

संतुलित आहाराबद्दल नेहमीच बोलले जाते. पण वेगवेगळ्या रंगांचा वापरसुद्धा जेवणात करायला हवा हे माहित आहे का? निरनिराळ्या रंगांच्या खाद्यपदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना फायदा मिळतो.
लाल
छातीच्या संरक्षणासाठी लाल रंगांच्या भाज्या, फळं खायला हवेत. लाल (गुलाबी) रंगांच्या भाजीपाल्यात फायटो केमिकल्स असतात. टरबूज, पेरू, टोमॅटो इत्यादी या श्रेणीत येतात. स्ट्रॉबेरी, रासबेरी आणि बीटरूटमध्ये एंथोसायनीन असतात. हा फायटोकेमिकल्समधील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित रहातो. डायबिटीससंबंधित समस्या आसपास फिरकत नाहीत. 

पुढील पानावर पाहा हिरव्या रंगांच्या फळ व भाज्या...


हिरवा

हिरव्या फळ-भाज्यांमध्ये लुटीन व इंडोल नावाची फायटोकेमिकल्स असतात. त्यामुळे आतड्यांचे संरक्षण होते. म्हणून हिरव्या रंगांच्या वस्तू भरपूर खायला हव्या.

webdunia
WD


पुढील पानावर पाहा जांभळ्या रंगांच्या भाज्या व फळे...


जांभळा

मेंदू निरोगी रहाण्यासाठी जांभळ्या रंगांच्या फळ-भाज्यांचा आहारात समावेश केला पाहिजे. उदा. जांभूळ, कांदे, जांभळ्या रंगाचा कोबी, वांगे इत्यादी.

webdunia
WD

पुढील पानावर पाहा काळ्या रंगांच्या भाज्या व फळे....


काळा

काळा रंग लोकांना जास्त आवडत नाही. खासकरून खाण्या पिण्याच्या वस्तूंमध्ये. पण काळ्या रंगांचा आहार फायदेशीर आहे. मनुका, काळ्या रंगांची चवळीच्या शेंगा इत्यादी म्हणूनच खाव्यात.

webdunia
WD

पुढील पानावर पाहा पांढर्‍या रंगांच्या भाज्या व फळे....


पांढरा

बटाटे, लसूण, पांढरे मशरूम इत्यादींच्या सेवनाने फुफ्फुसाला फायदा होतो.

webdunia

WD

पुढील पानावर पाहा नारंगी भाज्या व फळे....


नारंगी

प्लीहाच्या संरक्षणासाठी नारंगी रंगांची फळे खावीत. संत्र्यात व्हिटॅमिन सी तर असतेच पण काही प्रमाणात व्हिटॅमिन-ए सुद्धा असते. ते प्लीहेसाठी चांगले आहे.

webdunia
WD

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरगुती उपायांनी घालवा कोंडा