Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Diwali साठी मावा खरेदी करण्यापूर्वी शुद्ध आहे की बनावट, या प्रकारे ओळखा

Diwali साठी मावा खरेदी करण्यापूर्वी शुद्ध आहे की बनावट, या प्रकारे ओळखा
, बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (15:49 IST)
Diwali 2021 सणासुदीला सुरुवात झाली आहे. काही दिवसांनी दिवाळी, भाऊबीज येणार आहेत. अशा वेळी प्रत्येक सणाची मजा द्विगुणित करण्यासाठी आणि नात्यात गोडवा आणण्यासाठी लोक अनेक प्रकारची मिठाई घरी बनवतात. बहुतेक मिठाई माव्यापासून बनवल्या जातात. जे खायला खूप चविष्ट असतात. मिठाई बनवण्यासाठी वापरण्यात येणारा मावा जर बनावट असेल तर तो दिवाळीची मजा तर खराब करू शकतोच शिवाय तो तुमच्या आरोग्यासाठीही घातक ठरू शकतो. अशा परिस्थितीत तुम्हीही या दिवाळीत मावा खरेदी करणार असाल तर मावा खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा.
 
मावा खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा-
मावा ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे खरा खवा मऊ आणि बनावट खवा खडबडीत असतो. खवा मऊ नसेल तर अशुद्ध आहे हे समजून घ्या.
मावा घेण्यापूर्वी थोडा खवा खाऊन बघावा. मावा खरा असेल तर तोंडाला चिकटणार नाही पण मावा चिकटला तर समजून घ्या की मावा खोटा आहे.
मावा खरेदी करण्यापूर्वी हातात मावा घेऊन त्याची गोळी तळहातावर ठेवावी. असे केल्यावर जर तो फुटायला लागला तर समजून घ्या की मावा बनावटी आहे.
अंगठ्याच्या नखेवर मावा चोळा. खरा असेल तर तुपाचा वास येईल.
मावा विकत घ्यायला गेलात तर तोंडात ठेवून तपासून पहा. मावा खाल्ल्यानंतर जर कच्च्या दुधाची चव जाणवत असेल तर मावा खरा आहे हे समजून घ्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उत्तान पादासन Uttanpadasana