Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फुफ्फुसांना निरोगी ठेवायचे असल्यास आपल्या आहारात हे मसाले समाविष्ट करा

फुफ्फुसांना निरोगी ठेवायचे असल्यास आपल्या आहारात हे मसाले समाविष्ट करा
, बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (19:35 IST)
लोक आपल्या आरोग्यासाठी काळजी घेतच होते, परंतु कोरोना विषाणूंच्या साथीने ही काळजी कित्येक पटीने वाढवली आहे.या नंतर लोक आपल्या खाण्या-पिण्याच्या आणि जीवनशैलीवर संपूर्ण लक्ष देत आहे. जेणे करून ते कोणत्याही गंभीर आजाराला बळी पडू नये. परंतु सध्याच्या या प्रदूषित वातावरणामुळे फुफ्फुसांना बरेच नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत हृदय आणि श्वासोच्छ्वासाशी निगडित बरेच आजार होण्याची भीती आहे. परंतु आपल्या स्वयंपाकघरातील काही असे मसाले आहे ज्यांच्या सेवन केल्यानं आपले फुफ्फुस निरोगी राहतील. चला तर मग अशा काही मसाल्यांबद्दल जाणून घेऊ या. 
 
* हळद- 
हळद ही आपल्या शरीरासाठी जीवनदायी औषधी मानली आहे. हळद बऱ्याच रोगांना दूर करण्यासाठी देखील ओळखली जाते. या मध्ये अँटिसेप्टिक आणि अँटी इंफ्लिमेंट्री चे गुणधर्म आढळतात.जी सूज कमी करून हवा स्वच्छ करतात.हळद ही अँटी व्हायरल देखील आहे, जे आपल्या फुफ्फुसांना संसर्गापासून वाचवते.अशा परिस्थितीत आपण आपल्या अन्नात हळद वापरावी. तसेच हळदीचे दूध देखील फायदेशीर मानले आहे. कोरोनाच्या साथीच्या रोगात देखील हळदीचे दूध पिण्याचा सल्ला दिला आहे. लक्षात ठेवा की हळदीचे जास्त सेवन केल्यानं नुकसान देखील होऊ शकते.म्हणून ह्याचे सेवन योग्य प्रमाणात करावं.
 
* गिलोय -
गिलोय देखील आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. ह्याचा सेवन केल्यानं आपण बऱ्याच आजारापासून दूर राहू शकतो. कोरोनाकाळात लोकांमध्ये ह्याची बरीच मागणी होती. हे आपल्या रोग प्रतिकारक शक्तीला वाढविण्याचे काम करत.या मध्ये आढळणारे अँटिमायक्रोबियल गुणधर्म व्हायरसने होणाऱ्या आजारापासून वाचविण्यात मदत करतात. या व्यतिरिक्त गिलोयच्या सेवनाने सूज कमी होण्यात मदत मिळेल. आयुर्वेदामध्ये गिलोय रसायन मानले आहे, जे आरोग्यासाठी चांगले आहे.  
 
* ओवा- 
पोटात काही गडबड असल्यास सर्वप्रथम घरगुती उपाय म्हणून कोमट पाण्यासह ओवा घेतो. ओवा अन्नाची चव वाढविण्यासाठी मसाल्याच्या रूपात देखील वापरतात. या मध्ये आढळणारे अँटी ऑक्सीडेन्ट सूज कमी करण्यासाठी मदत करतात.हे श्वसनमार्गाला आराम देतात आणि फुफ्फुस स्वच्छ करण्यासाठी प्रभावी मानले जातात. म्हणून आपल्या आहारात ओवा  समाविष्ट करावं. हे शरीरासाठी आणि आरोग्यासाठी प्रभावी आणि फायदेशीर मानले आहे.  
 
* ऑरगॅनो-
जेव्हा आपण पास्ता किंवा मोमोज खाता त्यावर ओरेगॅनो घातलेच असणार, जे आपल्या चवीला वाढविण्याचे काम करतो. ओव्याच्या पानांना इंग्रजीत ऑरगॅनो म्हणतात. या मध्ये बायोऍक्टिव कंपाउंड पॉलिफेनॉल्स आणि फ्लेवोनाइड्स आढळतात. या मधील अँटिमायक्रोबियन गुणधर्म संसर्ग आणि आजारांपासून वाचण्यात मदत करतात.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हॅलेंटाइन डे विशेष : मुलांना देखणे आणि हँडसम दिसायचे असल्यास या फॅशन टिप्स अवलंबवा