Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रोज एक कप आइसक्रीम खाल्ल्याने शरीराला मिळतात बरेच फायदे

रोज एक कप आइसक्रीम खाल्ल्याने शरीराला मिळतात बरेच फायदे
, बुधवार, 28 नोव्हेंबर 2018 (00:01 IST)
जर तुम्हाला ही आइसक्रीम खाणे आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आतापर्यंत तुम्ही हे ऐकले असेल की आइसक्रीम खाणे आरोग्यासाठी योग्य नाही आहे. पण काही बाबतीत हे तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. वेग वेगळ्या फ्लेवरमध्ये येणारे आइसक्रीम तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. आइसक्रीम एक डेयरी प्रॉडक्ट आहे, म्हणून यात बरेचसे पोषक तत्त्व उपस्थित असतात. याच्या सेवनामुळे तुमचे शरीर निरोगी राहत. यात व्हिटॅमिन आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असत. जाणून घ्या आइसक्रीममुळे होणार्‍या फायद्यांबद्दल..  
 
हाडांची मजबुती वाढवतो 
डेयरी प्रॉडक्टमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असत. कॅल्शियमच्या सेवनामुळे हाड मजबूत होतात. शरीराला थकवा न येऊ म्हणून शरीराला  कॅल्शियमची गरज पडते. शरीरात उपस्थित 99 टक्के कॅल्शियम हाडांमध्येच असतात. अशात डेयरी प्रॉडक्टचे सेवन केल्याने तुमच्या शरीरात कॅल्शियमची भरपूर मात्रा बनते. रोज दुधाने तयार आइसक्रीम खाल्ल्याने ऑस्टियोपोरोसिस (हाड पातळ आणि कमजोर होण्याचे आजार)चा धोका कमी होतो.   
 
स्किनसाठी फायदेशीर  
दुधाने तयार आइसक्रीममध्ये प्रोटिनाचा देखील चांगला सोर्स असतो. प्रोटीन शरीराचे वेग वेगळे भाग जसे हाड, स्नायू, रक्त आणि त्वचेसाठी फायदेशीर असत. प्रोटिनाचे सेवन केल्याने ऊतक आणि स्नायू मजबूत होतात. शरीरातील काही भाग जसे नख आणि केस देखील प्रोटिनाने तयार होतात. आइसक्रीम खाल्ल्याने शरीराला प्रोटीन मिळत.  
 
रोग-प्रतिरोधक क्षमता वाढते 
आइसक्रीममध्ये व्हिटॅमिन ए, बी-2 आणि बी-12 असते. व्हिटॅमिन ए तुमची स्किन, हाड आणि इम्यूनिटी सिस्टमच्या क्षमतेला वाढवत. यामुळे डोळ्याची ज्योत चांगली होते. व्हिटॅमिन बी-2 आणि बी-12 मेटाबॉलिझमला संतुलित ठेवतो आणि बी-12 वजन कमी करण्यास सहायक असतो. जर तुम्हाला दूध पिण्यास त्रास होत असेल तर आइसक्रीम खाऊन व्हिटॅमिनची कमतरता पूर्ण करू शकता.  
 
आइसक्रीमचे नुकसान देखील आहे  
असे नाही आही की आइसक्रीमच्या सेवनाने तुम्हाला फक्त फायदाच होतो, यामुळे शरीराला काही नुकसान देखील होतात. आइसक्रीममध्ये शुगर कंटेंट जास्त असत. अशात जर तुम्ही जास्त प्रमाणात याचे सेवन करता तर लठ्ठपणाचा धोका वाढतो. त्याशिवाय बटर आणि चॉकलेटने तयार आइसक्रीममध्ये कॅलोरी देखील जास्त असते, जी शरीरासाठी नुकसानदायक असते. जास्त आइसक्रीमचे सेवन केल्याने डोकदुखी, फूड प्वाइजनिंग सारख्या समस्या देखील होऊ शकतात. लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे आइसक्रीम खाण्याअगोदर त्याच्या गुणवत्तेची जाच करणे आवश्यक आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डिंकाचे लाडू