Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मास्क न लावणे पडू शकतं महागात, या लोकांना संसर्ग होऊ शकतो

मास्क न लावणे पडू शकतं महागात, या लोकांना संसर्ग होऊ शकतो
, सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (16:51 IST)
जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यातून ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या आगमनानंतर नवीन प्रकरणांमध्येही वाढ दिसून आली आहे. दुसरीकडे कोविड-19 चे ओमिक्रॉन प्रकार अतिशय धोकादायक असून लोकांना लवकर पकडू शकते. ओमिक्रॉनमुळे डेल्टा प्रकारापेक्षा कमी गंभीर रोग होत असला तरी धोकादायक विषाणू राहतो.
 
ज्यांना अद्याप कोरोनाची लस मिळालेली नाही अशांंना हा विषाणू सहज धरतो. बरेच लोक याला हलके घेण्याची चूक करत आहेत आणि मास्क न लावता बाजारात दिसत आहेत. अशात, आम्ही जाणून घ्या की ओमिक्रॉन कोणाला सहज पकडत आणि ते टाळण्यासाठी काय केले पाहिजे.
 
ओमिक्रॉन वेरिएंटची लक्षणे गंभीर नाही परंतु ती हलक्यात घेऊ नये. ज्यांना अद्याप लसीकरण केले गेले नाही अशा लोकांना हा विषाणू सहज पकडू शकतो. म्हणून ताबडतोब लसीकरण करुन घ्यावं.
 
ओमिक्रॉन वेरिएंट अशा लोकांना त्वरीत संक्रमित करू शकतो ज्यांना श्वसनाचा कोणताही आजार आहे. अशा लोकांनी स्वत:ची विशेष काळजी घ्यावी. त्यासाठी कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा प्रयत्न करावा. सोबतच रोज योगा करावा. योगासनामुळे तुमचा श्वासाचा त्रास कमी होतो.
 
ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा लोकांना ओमिक्रॉन त्वरीत धरु शकतो. त्यामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ देऊ नका याची विशेष काळजी घ्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रपोझ डे मेसेज Propose Day Messages in Marathi