Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पिंपल्सवर घरगुती उपाय म्हणजे टोमॅटो

पिंपल्सवर घरगुती उपाय म्हणजे टोमॅटो
, बुधवार, 10 ऑक्टोबर 2018 (00:06 IST)
टोमॉटो आपल्या चेहऱ्यावरील मुरूम घालवण्यासाठी उत्तम औषध आहे. 200 ग्रॅम टोमॅटो व ओल्या हळदीचा रस नियमित तीन महिने चेहल्यावर लावल्याने मुरूम नाहीसे होतात व चेहरा सतेज होतो.
 
चेहऱ्यावर झालेल्या मुरूमांना वैतागलेल्या तरूण-तरूणींनी बीट-सफरचंद-पेरू व पपईचा रस दररोज प्यावा. खीरा काकडी-गाजर-कोथिंबीर यांचा रस त्याचप्रमाणे आवळा चूर्ण सेवन करावे. द्राक्ष, नासपतीचा रस, पालक-टोमॅटोचा रस घेतल्याने पीत्त कमी होऊन मुरूम नाहीसे होतात. 
 
टोमॅटो व नारळपाण्यात आले किंवा लिंबाचा रस अर्धा चमचा टाकून घेल्याने शरीरात झालेल्या चेहऱ्यावर झालेल्या गाठी नाहीशा होतात. चेरी-पालक-टोमॅटो यांचा रस अधिक लाभदायी आहे. कोमट पाण्यात लिंबाचा रस, तुळशीचे पाने, गहू व ज्वारीचा रस गाठींवर औषधासारखे काम करतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चेहर्‍यावरचे काळे दाग मिटवण्यासाठी पपई-काकडीने खुलवा सौंदर्य