Benefits of jaggery आरोग्यासाठी गूळ चांगलाच असतो हे सर्वांना माहीत असते.
अनशापोटी गूळ खाल्ल्यास 4 फायदे होतात. आपल्यापैकी बहुतेक लोक रात्री जेवल्यानंतर गूळ खातात. त्यामुळे जेवण पचण्यास मदत होते. अनशापोटी गूळ खाल्ल्यावर कोमट पाणी प्यायल्यास त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे असतात.
रक्तदाब नियंत्रणात राहातो : रक्तदाब नियंत्रणासाठी गूळ प्रभावी ठरतो. गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम आणि फॉस्फरस आढळते. हे हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहेत. गुळाबरोबर आले सेवन केल्यास सांधेदुखीपासून मु्क्ती मिळते.
रक्त साफ होते : सकाळी अनशापोटी गूळ खाऊन कोमट पाणी प्यायल्यास रक्त स्वच्छ होते. त्यामुळे नवीन रक्त तयार होते. हृदयरोग होण्याचा धोका दूर ठेवण्यासही गुळाच्या सेवनाचा फायदा होता.
शरीराला मिळते ताकद : गुळाच्या नियमित सेवनाने शरीर ताकदवान होते. दिवसभराचा थकवा दूर होण्यासही मदत होते. शरीरात ऊर्जा पातळी कायम राहाते आणि ती कमी होत नाही.
पचनसंस्था मजबूत होते : ज्या लोकांना आहार सहजपणे पचवण्यात अडचणी येतात त्यांनी गूळ आणि गरम पाणी सेवन करावे. या व्यक्तींसाठी ते औषधासारखे कामकरते. त्याचबरोबर बद्धकोष्ठता, पोटात वायू होणे, अॅसिडीटीसारख्या समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते.