स्वयंपाकघरातील सर्व प्रकारच्या नमकीन पदार्थांसाठी, रुचकर भाज्यांसाठी तसेच लोणच्यात उपयोगात येणार्या हिंगाचे 'बाल्हाक' आणि 'रामठ' असे दोन प्रकार आहेत. पण बाजारात रंगावरून 'काळा हिंग' आणि 'पांढरा हिंग' असे दोन प्रकार केले जातात.
आयुर्वेदाचार्यांच्या मते हिंग हा अजीर्ण, अधोवायू, मलावरोध आणि शूळ इत्यादी विकार नाशक आहे. तो कफहारी आहे.
दात दुखत असल्यास हिंग पाण्यात उकळून त्याने गुळण्या कराव्यात. याने दातदुखी कमी होते. दाताच्या पोकळीमध्ये हिंग ठेवल्याने दंतकृमी मरण पावतात.
काविळीमध्ये अनेक उपचार करूनही त्रास होत असेल तर हिंग उंबराच्या सुक्या फळाबरोबर एकजीव करावा आणि नंतर त्याचे सेवन करावे. या उपायाने कावीळ संपुष्टात येते.
मूत्रावरोधामध्ये बडीशेपच्या अर्कामध्ये हिंग मिसळून दिल्यास लाभदायक ठरते. हिंग स्मरणशक्ती वाढवण्यासाठीही उपयुक्त आहे.