Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिवाळ्यात घसा खवखवत असल्यास या टिप्स अवलंबवा

हिवाळ्यात घसा खवखवत असल्यास या टिप्स अवलंबवा
, शुक्रवार, 18 डिसेंबर 2020 (16:34 IST)
हिवाळ्यात आंबट आणि थंड गोष्टींचे सेवन केल्याने घसा खवखवणे किंवा घसा खराब होऊ शकतो. कोरोना साथीच्या आजारात, आजकाल प्रत्येक जण घसा खराब होण्याच्या परिस्थितीमध्ये त्वरितच घसा बरं करण्याची इच्छा बाळगत .जर आपण देखील अशाच प्रकारच्या समस्या पासून त्रस्त असाल तर या पासून वाचण्यासाठी आम्ही आपल्याला काही आयुर्वेदिक टिप्स सांगत आहोत ज्यामुळे आपला घसा बरं होण्यात मदत मिळेल. 
 
* गरम पाणी प्यावं -
आयुर्वेदात गरम पाणी पिण्याचे महत्त्व आणि फायदे सांगितले आहे. गरम पाणी प्यायल्याने शरीरात चरबीचे प्रमाण नियंत्रित होण्यासह पचन देखील चांगलं राहत. घशात कोणत्याही प्रकाराची खवखव असल्यास रात्री गरम पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने गुळणे करा.
 
* सफरचंदाचे व्हिनेगर -
गरम पाण्यात 2 चमचे सफरचंदाच्या व्हिनेगर ला मिसळून प्यायल्याने  व्हिनेगर मध्ये असणारे अम्लीय गुणधर्म घशातील बेक्टेरिया चा नायनाट करतात. घशातील खवखव दूर करण्यासाठी एक कप गरम पाण्यात एक चमचा मीठ आणि एक चमचा सफरचंदाचे व्हिनेगर मिसळून गुळणे करा.
 
* तुळशीचा काढा -
तुळशीचा काढा बनविण्यासाठी एक कप पाण्यात 4 ते 5  काळी मिरी आणि तुळशी चे 4 ते 5 पान घालून उकळवून काढा बनवा आणि या काढ्याला रात्री झोपण्याच्या पूर्वी प्यावं. या मुळे फायदा होईल.
 
* सकाळी कॉफी ऐवजी हळदीचा चहा प्या - 
हळदीला त्याच्या गुणधर्मा मुळे ओळखले जाते. आयुर्वेदात हळदीच्या साहाय्याने बऱ्याच रोगांवर उपचार करणे सहज शक्य आहे. हळद शरीराचे दाह किंवा जळजळ  कमी करण्यासह सूज आणि सर्दी पडसं देखील बरे करते. तर मग पुढच्या वेळी चहाच्या ऐवजी आयुर्वेदिक हळद चहा वापरा. आपण घरी देखील हळदीचा चहा बनवून पिऊ शकता. या साठी एका भांड्यात एक कप पाणी घालून त्यामध्ये हळद, आलं आणि लवंग टाकून 10 मिनिटे उकळवा. आपली इच्छा असल्यास या मध्ये दूध घाला अन्यथा आपण याचे सेवन ब्लॅक टी म्हणून देखील घेऊ शकता.
 
 
* प्राणायाम -आयुर्वेदानुसार घसा तंदुरुस्त ठेवण्यासाठी सिंहासन प्राणायाम करण्याचा सल्ला दिला जातो. हे प्राणायाम करताना कॅट काऊ स्थितीत येऊन आपले बुट्क्स वर नेत पोटाला खाली आणा. असं करताना समोर बघताना जीभ बाहेर काढा आणि वेगाने श्वास सोडा. हा प्राणायाम घसा स्वच्छ आणि निरोगी ठेवतं. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Fast House Cleaning Tips परिश्रम आणि वेळ वाचेल