"उबाका बस्की", हे कुठल्यातरी रशियन माणसाचे नाव नाही,
हे मला सांगलीत कळलं!
"च्यापी फुकून", हे कुठल्यातरी जापानी मुलीचे नाव नाही,
हे मला लातुरला कळलं!
"शायना झालाकाबे" हे कुठल्या जर्मन बाईचे नाव नाही,
हे मला नागपूरला गेल्यावर कळलं!
"अस्का करालईस", हे कुठल्यातरी ग्रीक माणसाचे नाव नाही,
हे मला कोल्हापूरात कळलं!