काल मी माझ्या एका जुन्या मित्राला भेटायला गेलो होतो . त्याचा आलिशान 3 bhk फ्लैट होता . सजावट छान केली होती. 3 ही बेडरूम ला अलग अलग रंग होते . घरात वयस्कर सगळेच होते . मुलगा सून नातवंड दिसली नाहीत. तो म्हणाला होता की मला दोन मुलगे आहेत . तीन नातू व दोन नाती आहेत . पण कोठेही घरात त्याचा वावर दिसत नव्हता. मुलांसाठी मी येताना खाऊ आणला होता . आपल्याकडे खालीहात जाण्याची पध्दत नसल्यामुळे मी नेहमी प्रमाणेच गेलो .
पण न राहवून मी शेवटी गप्पांच्या ओघात विचारले ....मित्रा , अरे मुलं-नातवंड दिसत नाहीत .
आणि....
तो समजला... त्याने मला संपूर्ण सगळ्यांची ओळख करून दिली .
" हे थोरल्या मुलाचे सासू-सासरे , व हे धाकट्या मुलाचे सासू-सासरे . व आम्ही दोघे असे सर्व एकत्र रहातो ."
आमच्या रूम वेगवेगळ्या आहेत . पण आमच किचन एकच आहे. आम्ही आमच्या सवयी आवडी निवडी ज्या एकच आहेत त्या सामुहिक साजऱ्या करतो . व एक आड एक दिवस प्रत्येक जण आपापल्या आवडी निवडी नुसार अटेंड करतो. जे वृद्धाश्रमात असते तसेच आम्ही या घरात असतो .
आमची मुले कामावर जाताना मुले आमच्याकडे सोपवून जातात व परत घरी आल्यावर येथे आम्ही सर्वजण एकत्रित चहापणी नाष्टा करून ते मुलाना घेऊन त्यांच्या फ्लॅटमध्ये जातात . त्यांचे फ्लॅट आमच्या समोरच्याच बिल्डींग मध्ये फक्त एक 10 व्या मजल्यावर व एक 7 व्या मजल्यावर असे प्रत्येकी 2.5 bhk चे फ्लॅट आहेत. व आमचा हा पाचव्या मजल्यावर थ्री बीएचके .
आम्ही खूप मजेत आहोत. आम्हाला प्रायव्हसी पण आहे . आम्ही गावी जाताना आपापल्या बेडरूमला लॉक करून जातो. घरातले सर्व सामान मुलेच भरतात . स्वयंपाक आम्ही करतो . पण बाकी वर कामास , झाडूपोछाला बाई आहे .
आणि आम्ही खूप खूप आनंदात जीवन जगतो .
मला नाटकं आवडतात व माझ्या व्याह्याना सिनेमे आवडतात.
मुलाना सुटी लागली . ते आम्हाला सर्वांना घेऊन स्पेशल गाडी काढून फिरायला नेतात . आणि आम्ही सर्व ते दोन दिवस खूप एन्जॉय करतो .
प्रत्येक जण आपापल्या गोळ्या औषधे संभाळून असतात .
चला मी तुला नातवंडांची गाठ घालून देतो . मग त्याने फोन करून आपल्या दोन्ही मुलाना घरी बोलावले . मुलांचे मला खूप कौतुक वाटले .
15 मिनिटात नातवंडे सुनांसह दोन्ही मुलगे हजर . नातवंड सुध्दा आजोबा नाना आबा करीत आली .
मला सूनानी जेवणाचा आग्रह केला . दोन्ही सुना येथे सख्ख्या बहीणी सारख्या वावरत होत्या. मला खूप कौतुक वाटले त्यांचे.