Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी!

अक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी!

वेबदुनिया

WD
अक्षय तृतीया हा सण वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जातो. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी दान, होम, जप व पितरांचे तरपण करतात. यंदा अक्षय तृतीया मंगळवारी 24 एप्रिल 2012ला येत आहे. या दिवशी ज्यांचा विवाह आहे, त्याने काय करावे किंवा कुठल्या देवी देवतांचे पूजन केले पाहिजे, ज्याने त्यांच्या वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी नांदेल व त्यांचा वैभव यथावत राहील.

मेष : या राशीच्या जातकाने गणपतीचे दर्शन करावे व 'गं गणपतये नम:'ची 9 माळ करावी.

वृषभ- या राशीच्या जातकांनी कन्या पूजन करून दुर्गा चाळिसाचा पाठ करावा.

मिथुन- या राशीच्या लोकांनी शंकराची आराधना केली पाहिजे.

कर्क- या राशीच्या लोकांनी गुरुचे दर्शन घ्यावे व शिवाष्टक किंवा शिव चाळीसा करायला पाहिजे.

सिंह- या राशीच्या जातकांनी प्रात: सूर्याचे दर्शन करून आदित्यहृदयस्तोत्रमचा पाठ करावा.

कन्या- या राशीच्या लोकांनी (देवी)चे दर्शन करावे व गणेश चाळिसा म्हणावा.

तूळ - या राशीच्या जातकांनी राधाकृष्णाचे दर्शन घ्यायला पाहिजे व कृष्णाष्टक किंवा 'ॐ नमो भगवते वासुदेवाय'ची माळ जपावी .

वृश्चिक- या राशीच्या लोकांनी शंकराचे दर्शन करून शंकराचे द्वादश नावाचे उच्चारण (बारा ज्योतिर्लिंगाच्या नावाचे उच्चारण) करायला पाहिजे.

धनू- या राशीच्या जातकाने श्री दत्ताचे दर्शन करावे व गुरुचा पाठ म्हणावा.

मकर- या राशीच्या जातकांनी मारुतीचे दर्शन घ्यायला हवे व हनुमान चाळिसाचा पाठ करावा.

कुंभ- या राशीच्या लोकांनी राम-सीतेच दर्शन घ्यावे व रामरक्षा स्रोताचा पाठ करावा.

मीन- या राशीच्या लोकांनी श्री गणेश किंवा सांईं बाबाचे दर्शन घ्यावे व 'बृं बृहस्पते नम:'च्या 9 माळा फेराव्या.

वर दिलेले उपाय केल्याने तुमच्या दांपत्य जीवनात नक्कीच सुख समृद्धी नांदेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi