Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आज सोमवती अमावस्या आणि शनीचे दुर्लभ योग बनत आहे

आज सोमवती अमावस्या आणि शनीचे दुर्लभ योग बनत आहे
, सोमवार, 18 मे 2015 (12:19 IST)
18 मे 2015 सोमवारी अमावस्या (सोमवती अमावस्या) आहे आणि शनी जयंती देखील आहे. या दिवशी कृत्तिका नक्षत्र राहील, ज्याचा स्वामी सूर्य आहे. सूर्य आणि शनी, दोन्ही पिता-पुत्र आहे. यमराज,शनीचा भाऊ आहे आणि यमुना (नदी) बहीण मानली जाते. हे सर्व सूर्य आणि छायाच्या संतानं आहे, म्हणून यांचा वर्ण काळा आहे. सर्व नऊ ग्रहांमध्ये शनी सूर्यापेक्षा सर्वात जास्त अंतरावर स्थित आहे. म्हणून शनीला एका राशीतून दुसर्‍या राशीवर जाण्यास किमान 27 महिन्याचा वेळ लागतो. शनैशनै: अर्थात हळू हळू चालण्यामुळे या ग्रहाला शनैश्चर म्हणतात. या ग्रहाचे एक नाव मंद देखील आहे. वर्तमानात शनी वृश्चिक राशीत आहे. या राशीचा स्वामी मंगळ आहे. शनी आणि मंगळ, दोन्ही ग्रहांमध्ये शत्रुतेचा भाव राहतो.  
 
शनीवर राहणार आहे या ग्रहांची दृष्टी - या वर्षी शनी जयंतीच्या दिवशी सूर्या (शनीचे पिता)ची पूर्ण दृष्टी शनीवर राहणार आहे. सूर्यासोबत चंद्रमा, मंगळ आणि बुध वृषभ राशीत स्थित आहे, यामुळे या ग्रहांची दृष्टीपण वृश्चिक राशीत स्थित शनीवर राहणार आहे.  
 
असा योग केव्हा बनला होता - या अगोदर 27 मे 1987 (शनी जयंती) 28 वर्ष अगोदर सूर्याचे कृत्तिका नक्षत्रामध्ये पूर्ण दृष्टी आणि  उच्चच्या चंद्रमासोबत गुरुची दृष्टी शनीवर होती.  
 
साडेसाती आणि ढय्येची स्थिती - तुला, वृश्चिक आणि धनू राशीवर शनीची साडेसाती सुरू आहे. मेष आणि सिंह राशीचा ढय्या सुरू आहे. या मुळे या राशीच्या लोकांसाठी शनी जयंतीचे जास्त महत्त्व आहे. या लोकांना शनी जयंतीवर दान आणि निर्धनांची सेवा करायला पाहिजे. ज्याने शनीच्या प्रकोपाला शांत करता येईल.  

Share this Story:

Follow Webdunia marathi