एकदा एका राज्याचा राजा दुसऱ्या राजावर हल्ला करतो आणि त्याची सर्व संपती लुटून घेतो.त्याच्या राज्यावरही ताबा घेतो. नंतर तो युद्धातून आणलेली सर्व संपत्ती पत्र्याच्या पेट्यांमध्ये ठेवतो आणि त्या पेट्या राजमहालतील बागेत पुरून टाकतो.
या युद्धात पराभूत राजाचा राजकुमार स्वतःची सुटका करून तेथून पळ काढतो. विजेत्या राजाने त्याला कधीच पाहिलेले नसते.
या गोष्टीचा फायदा घेत राजकुमार संन्याशाचे रूप धारण करतो आणि विजेत्या राजाला भेटायला जाण्याचे निर्णय घेतो. तो आणि त्याचे अनुयायी राजाकडे येतात. विजेता राजा पराभूत राजकुमाराचे तेजस्वी आणि खान्दानी रूप पाहून त्याला चांगला पाहुणचार करतो. पाहुणा म्हणून त्याला राजेशाही वागणूक देतो.
तेथे राहून तो आपल्या बुद्धी आणि शक्तीने खजिना कोठे पुरून ठेवला आहे हे शोधून काढतो. संधी सापडताच तो राजवाड्याच्या आवारातील बागेत पुरलेलं ते सारे धन घेऊन तेथून पळून जातो. जेव्हा राजाला त्याच्या खजिन्याच्या चोरीबद्दल समजते त्याला खूप दु:ख होते.
तेव्हा त्याचा प्रधान म्हणतो महाराज आपण का दु:खी होता. जी संपत्ती आपली कधी नव्हतीच तिच्याबद्दल आपण का दु:ख बाळगत आहात. तेव्हा राजाला सत्य उमगते आणि तो दुखातून बाहेर पडतो.
तात्पर्य - करावे तसे भरावे.