Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एवढशी लवंग किचनचे एवढेसारे काम करेल सोप्पे, जाणून घ्या फायदे

एवढशी लवंग किचनचे एवढेसारे काम करेल सोप्पे, जाणून घ्या फायदे
, शनिवार, 22 जून 2024 (07:00 IST)
किचन कॅबिनेटमध्ये असे अनेक मसाले असतात जे जेवणाची चव वाढवण्यासोबत किचनच्या इतर कामांमध्ये देखील मदत करतात, त्यामधीलच एक आहे लवंग. लवंगचा उपयोग महिला नेहमी जेवणाची चव वाढवण्यासाठी करता. पण याशिवाय लवंग अनेक कामांमध्ये उपयोगी आहे. तर चला जाणून घेऊ या लवंगचे इतर फायदे कोणते.
 
किडे दूर राहतात-
स्वयंपाक घरात नेहमी किडे निर्माण होतात, तसेच अनेक जणांच्या किचनमध्ये छोटे छोटे झुरळ येतात. अनेक वेळेस साखरेला देखील मुंग्या होतात. पीठ आणि तांदळाच्या डब्यामध्ये जाळे तयार होतात. या सर्व समस्या दूर ठेवण्यासाठी लवंग मदत करते. चहा पावडर आणि साखरमध्ये 3-4 लवंग टाकून स्टोर करावे. यामुळे मुंग्या लागत नाही.
 
माश्या दूर राहतात-
एका संत्रीवर अनेक साऱ्या लवंग लावा. यानंतर संत्री आणि लवंग ने बनलेले पोमॅनडरला अश्या जागी ठेवा जिथे माश्या येतात. या उपायामुळे माश्या येण्या बंद होतील.
 
जेवणाची चव वाढवते- 
लवंगाच्या सिरप बद्दल कदाचित तुम्ही ऐकले नसेल. पण याचा उपयोग तुम्ही डेजर्ट मध्ये करू शकतात. आइसक्रीम, डेजर्ट्स आणि कॉकटेलमध्ये लवंग सिरपचा उपयोग केल्यास चव वाढते. पाणी, साखर, लवंग उकळून घ्यावी. मगयाचा पाक तयार होईल. आता हे थंड करून याचा उपयोग तुम्ही करू शकतात.
 
किचन चमकवते-
किचनचे काउंटर किंवा स्लॅब स्वच्छ करण्यासठी पाण्यामध्ये 2-3 थेंब लवंगाचे तेल घालावे आणि मग स्वच्छता करावी. तुम्ही पाण्यामध्ये लवंग घालून ती उकळून त्याने देखील किचन स्वच्छ करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निरोगी शारीरिक संबंधासाठी इमोशन बॉन्डिंग आणि इंटीमेसी आवश्यक