Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एन्जॉय इन ऑफिस

एन्जॉय इन ऑफिस

वेबदुनिया

तुम्ही दिवसातील जास्तीत जास्त वेळ कोठे घालवता? असा प्रश्न नोकरी करणार्‍या कोणालाही केला तर त्याचं उत्तर ‘ऑफिसमध्ये’ असंच असेल. बहुतेकींचा दिवसातील जास्तीतजास्त वेळ ऑफिसमध्येच जात असतो. कामाचे तास वाढल्यामुळे दिवसातील बराच वेळ ऑफिसमध्येच जातो. त्यामुळे तेथील वातावरण आणि आपला मूड हे दोन्ही चांगलं असेल याची काळजी घेणं गरजेचं असतं. या दोन्ही घटकांकडे लक्ष दिलं तरच आपण ऑफिसमध्ये चांगल्या पद्धतीने काम करु शकू. बहुतेक लोकांना ऑफिसमधील कामाचा बराच ताण असतो. त्याचा परिणाम कामावर होतोच त्याचबरोबर आरोग्याच्यादृष्टीनेही हा ताण घातक आहे. आपल्याला कामामध्ये काही अडचणींना सामोरं जावं लागतं. तरीही डोकं शांत ठेवून आशावादी राहावं. याचं कारण आपल्या इच्छेनुरुपच सारं होईल असं नाही. त्यामुळे मनात धैर्य असावं. डोक्यात नकारात्मक गोष्टी आणू नका.

ज्या लोकांबरोबर आपल्याला दिवसातले आठ ते बारा तास घालवायचे आहेत त्यांच्याबरोबर आपला व्यवहार मैत्रीपूर्ण असायला हवा हे स्पष्ट आहे. ऑफिसमध्ये आपण कामाचं प्रेशर झेलत असतोच पण, सहकार्‍यांबरोबर मतभेद, वाद झाले तर त्याचा परिणामही आपल्या कामावर होत असतो. एकमेकांच्या सहकार्याशिवाय कोणतंही काम होऊ शकत नाही हेदेखील आणखी एक सत्य आहे. कधी ना कधी आपल्याला कामासाठी दुसर्‍या कोणाची मदत घ्यावी लागतेच. त्यामुळे ऑफिसमधील लोकांशी बोलताना आपला चेहरा हसतमुख आणि त्यांच्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार करावा.

अनेकदा आपण मनातील राग शब्दांनी व्यक्त करत नाही. पण, बॉडी लँग्वेजमधून लोकांच्या लक्षात येतं की आपल्या मनात संताप आहे. कॉम्प्युटरच्या की-बोर्डवर जोराने टाईप करणं, फोन रागाने आदळणं, ड्रॉवर्स पटापट बंद करणं अशा गोष्टीतून मनातील राग व्यक्त होत असतो. ऑङ्खिसमध्ये आपलं अशा प्रकारचं वर्तन घातक ठरु शकतं.

त्यामुळे मनातल्या मनात धुसफुसण्याऐवजी राग निवळण्यासाठी वेळ द्या. ऑफिसमध्ये रोज घरुन टीफीन घेऊन जातो किंवा

कॅन्टीनमध्ये खातो. रोज रोज हे करणं कंटाळवाणं वाटतं. त्यापेक्षा एखाद्या दिवशी बाहेर जेवायला जाण्याचा प्लॅन का आखू नये? ऑफिसच्या लंच अवरमध्ये सहकार्‍यांबरोबर जवळच्याच एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जावं. महिन्यातून दोन-चार वेळा असं केलं तर किती मजा येते ते पहा. बंदिस्त वातावरणापेक्षा अशा मोकळ्या वातावरणात मैत्रीचं नातं जास्त फुलतं.

ओंकार काळे

Share this Story:

Follow Webdunia marathi