आपल्या प्रियकर/प्रेयसीची आवड जाणणे प्रेमात फार आवश्यक असते. याने आपसातील नाते बळकट होतेच पण एकमेकांचा स्वभाव ओळखण्यासही मदत होते. तुमचा प्रियकर रागावला तर, त्याचा राग दूर करण्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे. तो /ती रागावला असेल तर त्याला आवडते तेच करा. म्हणून तर प्रेमात म्हणतात ना 'जो तुमको है पसंद वही बात करेंगे...' आता त्यांना काय आवडते ते लक्षात घ्या...
*त्यांचा आवडता रंग
*भाग्यशाली अंक
*आवडते फूल
*त्याला/तिला काय ऐकणे आवडते?
*आवडता गायक/गायिका, आवडते गाणे, आवडता संगीतकार
*आवडते हॉटेल, मिष्टान्न, जेवणातील पदार्थ...
*आवडता अभिनेता/अभिनेत्री
*त्याला/तिला एकांतात वेळ घालवायला आवडेल असे ठिकाण
*आवडता परफ्यूम, मेकअप ब्रॅंड
*आवडता लेखक/साहित्यिक
*आवडता ड्रेस
*आवडता खेळ/खेळाडू
*आरामाचा आवडता वेळ
*आवडते व्यक्तित्व
या आणि अशा काही गोष्टी जाणून घेऊन तुम्ही लवकर त्याचा/तिचा राग दूर करू शकता. आणि मग खुशाल गुणगुणा 'तुम रूठी रहो, मै मनाता रहू....'