Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

NRI सोबत लग्न करत असाल तर नक्की वाचा

NRI सोबत लग्न करत असाल तर नक्की वाचा
, शनिवार, 16 जानेवारी 2021 (16:23 IST)
आपण मुलीसाठी स्थळ बघून NRI मुलासोबत लग्न करून तिचा संसार परदेशात थाटण्याची स्वप्न बघत असाल तर एकदा नक्की वाचा. खाली दिलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेऊन लग्न लावायला हरकत नाही अन्यथा मुलीचं आयुष्य बरबाद होऊ शकतं. 
 
योग्य माहिती
मुलाच्या बाबतीत सविस्तर माहिती असावी, मुलगा अगदी ओळखीतला असला तरी. यासाठी आपण परदेशात राहणार्‍या नातेवाईकांची किंवा मित्रांची मदत घेऊ शकता. परदेशातील कुठल्या भागाला आणि कोणत्या कंपनीत कोणत्या पदावर आहे याची खात्री करुन घ्या. ऑफिसद्वारे ही माहिती आपल्याला मिळू शकते. याव्यतिरिक्त तो राहत असलेलं फ्लॅट कोणत्या भागात आहे, त्यासोबत इतर कोणी तर राहत नाही अन्यथा काही वेळेस मुलाची रिलेशनशीप स्टेटस माहित नसल्यामुळे फसवणूक होते.
 
व्हिजा आणि इतर औपचारिकता
मुलाकडे कोणत्या टाइपचा व्हिजा आहे तसेच तिथे पोहचण्यासाठी प्रक्रिया काय. कनेक्टिंग फ्लाइट्स किंवा किती वेळ लागतो, इतर कोणत्या औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात. हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
 
क्रिमिनल रेकॉर्ड
त्या देशात मुलाच्या नावावर कोणतेही क्रिमिनल रेकॉर्ड तर नाही हे बघायला विसरु नये. त्याच्या मित्रमंडळींमधील कोणी क्रिमिनल तर नाही हे जाणून घेणे ही आवश्यक आहे कारण यामुळे धोका निर्माण होऊ शकतो.
 
लग्नाचं रजिस्ट्रेशन
लग्न कोणत्याही पद्धतीने पार पडणार असलं तरी लग्नाचं रजिस्ट्रेशन करायला विसरू नका. 
 
भारतीय दूतावास संपर्क
भारतात त्यांची प्रॉप्रटी, घरचा पत्ता, व्हिजा, पासपोर्ट या व्यतिरिक्त वोटर रजिस्ट्रेशन कार्ड आणि सामाजिक सुरक्षा नंबरची चौकशी आवश्यक आहे. तसेच गंभीर परिस्थिीत जवळीक बँकेत खाते उघडणे कधीही योग्य ठरेल. सोबतच मुलाच्या शेजारच्यांचे, पोलिस, एंबुलंस आणि भारतीय दूतावासचे नंबर यादीत सामील करावे. 
 
कायदे माहित असावे
मुलीला परदेशात पाठवण्यापूर्वी तेथील कायदे आणि आपले हक्क याची जाणीव करुन द्यावी. घरगुती भांडणे आणि शोषण अशा स्थितीत तेथील अथॉरिटी आणि आपल्या नातेवाइकांनी सूचित करावे.
 
महत्त्वाचे कागदपत्रे
मुलीचे महत्त्वाचे कागदपत्रे जसे पासपोर्ट, व्हिजा, बँकेचे कागदं, प्रॉपर्टी संबंधित कागदं, मॅरिज सर्टिफिकेट आणि महत्त्वाचे फोन नंबर आपल्या विश्वासू माणसांकडे ठेवावे. स्कॅन कॉपीज काढून ठेवाव्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेवणात जास्त मीठ पडलं, मग हे करा