Publish Date: Sat, 31 Dec 2022 (22:29 IST)
Updated Date: Sat, 31 Dec 2022 (22:34 IST)
नवीन येताच जुन्याला का विसरतात सारे?
आशा असते न माणसाला, येणारे घेऊन येणार चांगले खुपसारे!
घेता घेता ओंजळ सुद्धा कमी पडेल की काय?
एकदा का नवीन वर्ष उजाडलं, की वाटते हे आधीपेक्षा खराब की काय?
पण मित्रानो हे असं काहीही नसतं,
प्रत्येक काळ च हा थोडा बरा थोडा वाईट, असच गणित असत,
पण करा हो नवीन च हर्षित होऊन तुम्ही स्वागत,
तेवढंच तुम्ही हलके व्हाल, आणि राहाल हसत!
....नववर्षाच्या शुभेच्छा!!
..अश्विनी थत्ते