Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Marathi Kavita : ज्याचा तोच जाणतो, त्याचं खरं मूल्य

kavita
, शुक्रवार, 1 डिसेंबर 2023 (15:01 IST)
काही काही गोष्टी, दिसताक्षणी भूतकाळात नेतात,
घालवलेला क्षण, पुन्हा जिवंत होऊन जगायला लावतात,
रमवतात त्या काळात पुन्हा, आनंद देतात,
कधी कधी डोळ्यात टचकन पाणीही आणतात,
क्षुल्लक ही असतील त्या, पण त्याक्षणी फारच अमूल्य,
ज्याचा तोच जाणतो, त्याचं खरं मूल्य,
कोणीही नाही सुटलं, या अजब परिस्थितीतून,
अजब गजब असलं तरीही, बघावं लागत अनुभवून.!
..अश्विनी थत्त

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

AAI Recruitment 2023 Notification : भारतात नोकरीची सुवर्णसंधी