Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मृत्युंजयकार : शिवाजी सावंत

मृत्युंजयकार : शिवाजी सावंत

मनोज पोलादे

जन्म - आँगस्ट 31, 1940
मृत्यू- सप्टेबर 18, 2002

मराठी साहित्या विश्वात 'मृत्युंजय, युगांतर, छावा' सारख्या साहित्य मुल्य श्रेष्ठ कादंबर्‍यांचे लेखन करून साहित्य विश्वात मराठीचा झेंडा फडकाविणारे शिवाजी सावंत हे महान साहित्यकार होते. 'मृत्युजय' च्या प्रथम प्रकाशनास ‍तीन दशकांपापेक्षा अधिक कालावधी होवूनही आजही 'मृत्युंजय' ची लोकप्रियता कमी झाली नाही.

यातचं त्यांच्या कादंबरीचे श्रेठत्व सामावले आहे. साहित्याच्या कक्षा व्यापक असायला पाहिजेत, ते युनिव्हर्सल असायला हवे, कोणत्याही परिप्रेक्षात ते गैरलागू होता कामा नये व साहित्य हे कालातीत असावे ह्या सर्वच परिमाणात त्यांचे साहित आदर्श ठरून त्यांचे साहित्य भारतीय भाषासोबतच इतर जागतीक भाषांमध्येही भाषांतरित झाले आहेत.

मराठी साहित्य विश्वात इतिहास घडविणारया 'मृत्युंजय' कादंबरीचे हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती, मलयालम भाषातं भाषांतरे होवूनं ही कादंबरी घराघरात पोहचली. या कादंबरीचा महिमा इतका महान की शिवाजी सावंतांची ती ओळखच बनली. 'मृत्युजय' कार सावंत. शिवाजी सावंत यांचा जन्म सामान्य शेतकरी कुटूंबात झाला.

कोल्हापूर जिल्ह्या‍तील एका खेड्यात त्याचे बालपण गेले. शिक्षणानंतर कोल्हापूरातच त्यानी अनेक वर्षे शिक्षक म्हणूनं काम केले. अनेक जबाबदारया व पदे भुषविल्यानंतर त्यांनी संपूर्ण लक्ष लेखनावंर केंद्रीत करून साहित्य सेवा करत राहीले. मृत्युंजय शिवायं छावा, युगांतर, ह्या ऐतिहासिक कादंबरयांचे लेखनही त्यानी केले.

मृत्युंजय कादंबरी एवढी लोकप्रिय झाली की हिचेवर आधारित मराठी व हिंदी नाटकेही रंगभूमिवर आली. मृत्युंजय कादंबरी दानशुरतेसाठी प्रख्यात असलेला महान योद्धा कर्णाच्या जीवनावर तर युगांतर ही कादंबरी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारलेली आहे. मराठी भाषेतं कसदार लेखनं करूनं साहित्याची सेवा केल्याबद्दल त्यांना भारतीय ज्ञानपीठच्या मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


लेखन-

1. मृत्यजय
2. छावा
3. युगांतर
4. लढत
5. अशी मने असे नमूने
6. मोरावळा
7. संघर्ष
8. शेलका साज
9. कवडसे

Share this Story:

Follow Webdunia marathi