किती छान अनुभव असतो जेव्हा मुल पहिल्यांदा आईचा पोटात लाथ मारतं. जरा धक्का, जरा आश्चर्य आणि मग खूप मज्जा वाटतो जेव्हा मुलं लाथ मारतं. जीवनातील हे सुखद अनुभव घेताना आईला हा प्रश्न पडणं साहजिक आहे की मुल लाथ का मारतो. तर चला जाणून घ्या याचा अर्थ:
* पोटात असताना मुलाने लाथ मारणे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. याचा अर्थ मुल सक्रिय आहे.
* वातावरणात परिवर्तन हेही एक कारण आहे. अनेकदा बाहेरून येणार्या आवाजांमुळे मुल आतून प्रतिक्रिया देतो.
* डावीकडे झोपल्यावर मुल अधिक लाथा मारतो. कारण आई डाव्याबाजूला झोपल्यावर भ्रूणला रक्त पुरवठा वाढतो आणि त्याची हालचालही वाढते.
* जेवल्यानंतर लाथ मारण्याची गती वाढते.
* गर्भधारणाच्या नऊ आठवड्यानंतर मुल लाथा मारायला लागतो. दुसर्यांदा आई बनत असलेल्या स्त्रियांना हा अनुभव 13 आठवड्यानंतर जाणवतो.
* लाथ मारण्याची वारंवारता कमी असल्यास काळजी घ्यावी. याचा अर्थ मुल कमजोर असू शकतं. ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत असल्यास मुल सामान्यपेक्षा कमी लाथ मारतं.
* परंतु 36 आठवड्यानंतर लाथा मारण्याची गती कमी झाली तर काळजीचे कारण नाही कारण मुल जसं जसं वाढतं तसं तसं लाथा मारणेही कमी होत जातं.