Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घरात बनवायची असेल बाजारा सारखी आइसक्रीम तर या 3 टिप्स लक्षात ठेवा

घरात बनवायची असेल बाजारा सारखी आइसक्रीम तर या 3 टिप्स लक्षात ठेवा
, रविवार, 14 मार्च 2021 (09:41 IST)
आपल्याला घरात बाजारासारखी आइसक्रीम बनवायची असेल तर या तीन टिप्स लक्षात ठेवा जेणे करून आइसक्रीम खराब होणार नाही आणि बाजारासारखीआइसक्रीम मिळेल. 
 
1 आइसक्रीमवर बर्फ जमू देऊ नका- 
घरात आइसक्रीम बनवायची असेल तर या मध्ये  सर्वात मोठी समस्या म्हणजे की आइसक्रीमवर बर्फ जमा होते आणि या मुळे आइसक्रीमची चव बिघडते. असं होऊ नये या साठी हे खास तीन टिप्स अवलंबवा.  
* आइसक्रीम बटरपेपरने कव्हर करून फ्रीजमध्ये ठेवा. 
*  प्रत्येक दोन-तीन तासानंतर आइसक्रीम ढवळत राहा जेणेकरून त्यावर क्रिस्टल जमू नये. 
*  कस्टर्डबेस चांगल्या प्रकारे थंड करूनच फ्रीजमध्ये ठेवा. 
 
2 कोणतेही फ्लेवर मिसळण्यापूर्वी लक्षात ठेवा-
कोणतेही फ्लेवर आइसक्रीम मध्ये मिसळण्यापूर्वी लक्षात  ठेवा की आपण दुधाचे मिश्रण गरम असतानाच त्यामध्ये फ्लेवर मिसळू नये. असं केल्याने आइसक्रीमचा टेक्श्चर खराब होतो.आइसक्रीम चे सारण थंड केल्यावर त्याला चांगल्या प्रकारे फेणून घ्या आणि त्यामध्ये कोणतेही इसेन्स किंवा फ्लेवर घाला आणि किमान एक तास तरी फ्रीज मध्ये ठेवा.थोडं थंड होऊ द्या, नंतर फ्रीजर मध्ये ठेवा. लगेचच फ्रीजर मध्ये ठेवू नका.  
 
3 आइसक्रीम जमविण्यासाठी असे कंटेनर वापरा- 
आइसक्रीम जमविण्यासाठी चे कंटेनर किंवा पात्र सपाट असावे जास्त खोल किंवा उथळ असू नये.वाडग्यात किंवा डब्यात आइसक्रीम जमवायला ठेवू नका. अशा मुळे आइसक्रीम व्यवस्थित जमत नाही आणि दिसायला देखील खराब दिसते.चव पण वेगळी लागते. 
चला तर मग आता या पद्धतीने आइसक्रीम बनवून बघा आणि आइसक्रीम खाण्याच्या आस्वाद घ्या.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केसां व्यतिरिक्त हेयर स्प्रे असा देखील वापरता येतो