साहित्य-
एक किलो ताजे गाजर
एक लिटर क्रिमी दूध
मावा
अर्धा किलो साखर
वेलची
तूप
काजू, बदाम, पिस्ता
कृती-
गाजराचा हलवा बनवण्यासाठी सर्वात आधी गाजर हलके सोलून घ्यावे. नंतर ते स्वच्छ धुवून किसून घ्या. आता कुरकमध्ये गाजराचा किस घालावा. मंद आचेवर 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. आता जर तुम्ही दुधासोबत गाजराचा हलवा बनवत असाल तर एका कढईत फुल क्रीम दूध घालून उकळवून घ्या. दूध घट्ट होऊन माव्यासारखे झाले की त्यात शिजवलेले गाजर घालावे. शिजवलेल्या गाजरांमध्ये मावा घालावा. आता त्यात अर्धा किलो साखर किंवा तुमच्या चवीनुसार कमी-जास्त साखर घालावी. व मिक्स करावे. तसेच हिरवी वेलची घालावी. तसेच गाजराचा हलवा तयार झाल्यावर त्यात देशी तूप घालावे. तुपात सर्व साहित्य नीट मिक्स करून घ्यावे. नंतर वरून चिरलेले काजू, बदाम आणि पिस्ता घालावा. तर चला तयार आहे आपला हिवाळा विशेष स्वादिष्ट गाजर हलवा रेसिपी, गरम किंवा थंड देखील सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik