साहित्य-
एक कप- मैदा
एक कप- पिठी साखर
अर्धा कप- कोको पाउडर
अर्धा कप- गरम पाणी
अर्धा कप- थंड दूध
एक चमचा - व्हॅनिला एसेंस
दोन चमचे - दही
चिमूटभर - ईनो
एक चमचा - बेकिंग पाउडर
अर्धा कप- लोणी
कृती-
केक बनवण्यापूर्वी सर्वात आधी ओव्हन 180 अंशांवर प्री-हीट करण्यासाठी ठेवावे. तसेच केक मेकरला तुपाने ग्रीस करावे. आता एका भांड्यात मैदा, साखर, कोका पावडर, बेकिंग पावडर आणि चिमूटभर मीठ घालून मिक्स करावे. एका भांड्यात अर्धा कप बटर आणि अर्धा कप गरम पाणी घालावे. व पिठात चांगले फेटून घ्यावे. यानंतर दूध आणि व्हॅनिला एसेंस घालून मिक्स करा. नंतर दही आणि बाकीचे सर्व साहित्य घालावे. आता केक मेकरमध्ये ठेवा आणि 160 अंशांवर 35-40 मिनिटे बेक करावा. 40 मिनिट ठेवावे व चेक करून घ्यावे. आता केकमध्ये टूथपिक घाला, जर तो स्वच्छ बाहेर आला तर समजून घ्या की तुमचा केक तयार आहे. तुम्हाला आवडत असल्यास वरतून चॉकलेट सॉस घालू शकतात. तर चला तयार आहे आपला ख्रिसमस स्पेशल चॉकलेट केक.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik