Potato Jalebi Recipe :बटाटे हे सर्वानाच आवडतात. आपल्या जेवणात बटाटा हा सर्रास प्रमाणात वापरतात. बटाटा हा प्रत्येक पदार्थात वापरला जातो. बटाट्यापासून शिरा बनवतात. आज बटाट्यापासून जिलेबी बनवायची कशी हे जाणून घेऊ या.
आता पर्यंत आपण रव्याची,मैद्याची जलेबी बनवली असणार, आज आम्ही बटाट्याची जलेबी ची रेसिपी सांगत आहोत. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घ्या.
साहित्य-
तीन ते चार बटाटे, एक कप दही, एक कप आरारूट,एक कप साखर,केसर कांड्या,वेलचीपूड,गुलाबपाणी,तूप तळण्यासाठी.
कृती -
बटाटा जलेबी बनविण्यासाठी सर्वप्रथम बटाटे उकळवून सोलून मॅश करून घ्या. या मध्ये दही ,आरारूट मिसळून बटाट्याच्या सारणाचे पातळ घोळ तयार करा.केसरला गुलाबपाण्यात मिसळा.साखरेची एकतारी चाशनी बनवून केसर आणि वेलची पूड मिसळून द्या . पिशवीत किंवा बाटलीत घोळ भरून जलेबीचा आकार द्या आणि कढईत तूप तापत ठेवून जलेबी तळून घ्या .साखेरच्या पाकात जलेबी पाच ते सात मिनिटे बुडवून ठेवा नंतर गरम जिलेबी खाण्यासाठी सर्व्ह करा.