जाणून घ्या घड्याळच्या दिशेबाबत 7 महत्त्वपूर्ण गोष्टी...
आपाधापीच्या या जीवनात सर्वात महत्त्वपूर्ण स्थान असतं घड्याळीचे. केवळ घराच्या भिंतीवर घड्याळ लावून दिल्याने जीवनात यश मिळत नसून काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जाणून घ्या घड्याळासंबंधी काही महत्त्वपूर्ण गोष्टी... ज्याने निश्चितच आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि आपल्याला यश मिळेल.
1. घड्याळ नेहमी उत्तर किंवा पूर्व भिंतींवर लावावी.
2. पश्चिम दिशेतही घड्याळ लावायला हरकत नाही पण दक्षिण दिशेच्या भिंतीवर चुकूनही घड्याळ लावू नये. कारण दक्षिण भिंतीवर घड्याळ लावल्याने आपलं लक्ष वारंवार घड्याळीकडे जाणार आणि दक्षिण दिशेकडून येणारी नकारात्मक ऊर्जेमुळे आपल्या कामात निरंतर समस्या येत राहील.
3. नेहमी घड्याळ अश्या जागी लावावी जिथून ती सर्वांना आरामात दिसू शकते.
4. भिंतीवर लावलेल्या घड्याळीची सफाई करत राहावी, त्यावर धूळ साचता कामा नये.
5. काच तुटलेली घड्याळ लगेच बदलायला हवी. अशी घड्याळ घरात ठेवल्याने कुटुंबाच्या सदस्यांवर नकारात्मक प्रभाव पडतो.
6. जर आपण सजावट म्हणून मधुर संगीत किंवा ध्वनी उत्पन्न करणारी घड्याळ आणली असेल तर ती घरातील ब्रह्मस्थान स्थित लॉबीत लावावी. याचे दोन फायदे आहेत. पहिला- याने आपल्याला व कुटुंबातील लोकांना प्रगतीची संधी लाभेल आणि दुसरा- याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल.
7. स्वत:ची सोय किंवा सवय म्हणून घड्याळीची वेळ नियत वेळेपेक्षा मागे सेट करून ठेवू नये. या उलट जर आपण घड्याळ योग्य वेळेहून 10-15 मिनिट पुढे ठेवली तर आपल्याला योग्य दिशा मिळेल. यामुळे आपण प्रगती कराल.