Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वास्तुपुरूषाला जपणे किती आवश्यक आहे जाणून घ्या...

वास्तुपुरूषाला जपणे किती आवश्यक आहे जाणून घ्या...
, शनिवार, 6 जुलै 2019 (14:39 IST)
मर्मभेद 
मर्म म्हणजे नाजूक. भेदाचा अर्थ दाबणे किंवा त्रास देणे, ज्याप्रमाणे मनुष्याच्या शरीरावर काही नाजूक भाग असतात त्याचप्रमाणे वास्तुपुरुषाचेही नाजूक अंग आहेत. वास्तुपुरुषाच्या नाजुक भागाला कॉलम, दरवाजे, भिंती यामुळे त्रास देऊ नये किंवा त्यावर दाब देऊ नये. जर कोणत्या घरात हे भाग दाबले गेले तर त्या घरात त्याचे होणारे परिणाम ग्रंथांत वेगवेगळे सांगितले आहेत. वेगवेगळ्या प्रयोजनासाठी 81, 64, 100 पदविन्यास करून देवांना विराजमान करून मर्म-अंगांचे रक्षण करायला हवे. नेहमी झोपण्यासाठी जागा निवडताना दक्षिणेला किंवा पूर्वेला डोके करून झोपणे चांगले. झोपण्याच्या जागेने सुद्धा वास्तुपुरुषाला त्रास व्हायला नको.
 
घराची रचना
 
पाण्याची टाकी :
वास्तुशास्त्रात घराच्या संदर्भात पाण्याच्या शुद्धतेवर जास्त भर दिला आहे. असे म्हटले जातं की, जिथे पाण्याची मुबलकता व पाण्याचा निश्चित स्रोत आहे तिथे घर योग्य मानले जाते. कारण जगण्यासाठी पाणी बांधणे आवश्यक आहे. पाण्याच्या शुद्धतेविषयी असे म्हटले जाते की, 'दिवा सूर्यांश संतप्तं, रामो चंद्राशू शीतलक अंशू दकर्मित खांभ, आयुरारोग्य दायकम' दिवसा जे पाणी सूर्याच्या किरणांनी गरम होते व रात्री चंद्रप्रकाशात थंड होते ते अंशुद्ध संज्ञक जल आरोग्य देते.कोणत्या दिशेला विहीर खोदल्याचे काय परिणाम होतात या विषयी वशिष्ठ, विश्वकर्मा, कश्यप या सर्वाचे एकच मत आहे. गर्ग ऋषीनुसार घराच्या पूर्व, उत्तर, पश्चिम व ईशान्य दिशेला विहीर खोदणे जास्त लाभदायक व गायत्री मंत्राच्या उच्चारणाइतके पुण्य मिळते.
 
भूमिगत पाण्याचे स्रोत उत्तर-पूर्व दिशेला सर्वांत जास्त उपयुक्त आहे. विहीर जमिनीच्या पूर्वेला, उत्तरेच्या बाजूच्या पूर्वांधात असावी. याच प्रमाणे जर ट्यूबवेल उत्तरेला असेल तर जमिनीच्या पहिला अर्धा भाग पूर्वेला हवा. घराच्या मध्यभागी किंवा मुख्य दरवाजा समोर विहीर असू नये. पश्चिमेची विहीर आर्थिक समृद्धी देते. पण दक्षिणेला खोदलेली विहीर त्रास वाढवते. कोणत्याही जमिनीवर उत्तर, पश्चिम, पूर्व किंवा ईशान्य कोपर्‍यातील विहीर लाभदायक तर घराच्या मध्यभागी, दक्षिण, वायव्य, आग्नेय व नैरृत्येची विहीर अशुभ असते.
 
भूमिगत पाण्याप्रमाणेच साठवलेल्या पाण्याचाही आपल्याला गरज असते. त्यासाठी योग्य स्थळ ही वास्तुशास्त्रात सांगितले आहे. पाण्याची टाकी मुख्य घराला लागून असू नये. आणि जर उत्तर-पूर्वेला (अग्नेयेला) टाकी असेल तर त्यावर जास्त भार नको नैऋत्येला पाण्याची साठवण असणे चांगले. वायव्येला पाणी साठवणे चांगले नाही पण जमिनीवर पाणी साठवायचे असेल तर ती टाकी वायव्येला किंवा उत्तरेला असावी. प्लॉटबाहेर नैऋत्येला पाणी नसावे. पश्चिमेला ओवरहेड टँक ठेवू शकतो. ईशान्येची टाकी मोठी नसावी. घराच्या मध्यभागी ओवरहेड टँक नसावा. शक्यतो टाकी प्लॉस्टिकची नसावी व गडद निळ्या किंवा काळ्या रंगाची असावी कारण त्यामुळे सूर्याची उष्णता शोषली जाऊन अधिक फायदे मिळतात. वापरण्याच्या व पिण्याच्या पाण्याची साठवण वेगवेगळी असावी.
 
ड्रेनेज :
शुद्धतेच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने या गोष्टीकडे काणाडोळा करू नये. शहरात बेडरूमला लागून टॉयलेट, बाथरुम असते. काही ठिकाणी तर ते एटॅच असते. अशा वेळी दोन्हीत कमीतकमी 6 ते 9 इंच उंची असावी. संडासाचे पाणी मोरीत येऊ नये म्हणून मध्ये उंबरठा हवा. संडास पश्चिमेला किंवा दक्षिणेला असावा. नैऋत्येला किंवा मध्यभागी नसावा. आग्नेय, ईशान्येलाही घराचा संडास नसावा. संडासाचे दार पूर्वेला किंवा आग्नेयेला उघडणार नसावे. आतल्या माणसाचे तोंड उत्तरेला हवे. संडासाबाहेर पाण्याचा नळ ईशान्येला, पूर्वेला किंवा उत्तरेला असलेली चांगले पण नैऋत्य व आग्नेयेला नसावा. संडासाचा उतार व आऊट लेट पूर्वेला व उत्तरेला असावे व आत मार्बल नसावे तसेच लाइट पूर्व उत्तर किंवा पश्चिमेला हवा.
 
सेफ्टी टँक : 
पश्चिमेला मोकळ्या जागी हवा. किंवा नैऋत्य, मध्य उत्तरेच्या मध्ये, आग्नेय आणि मध्य उत्तरेच्या मध्ये मध्य पूर्व तसेच मध्य-पूर्व व उत्तर-पूर्वेच्या मध्ये किंवा वायव्य व मध्य दक्षिणेच्या मध्ये कुठेही तयार करावा. मध्ये, आग्नेय कोपर्‍यात अजिबात नको. सेफ्टी टँक आग्नेय, ईशान्य किंवा नैऋत्येला नसावा. तो वॉल कंपाऊंड, प्लिंथला चिकटलेला नसल्यास उत्तम, त्याचा आउटलेट उत्तर किंवा पश्चिमेला हवा. सेफ्टी टँकच्या 3 भागांपैकी पाणीवाला भाग पूर्वेला व अन्यभाग पश्चिमेला हवा.
 
बाथरुम आणि स्वयंपाकघराची पाईपलाईन पूर्व किंवा उत्तरेकडून आलेली असावी. त्याचा आउटलेट दक्षिणेला नसावा. संडासाचा पाइप पश्चिम किंवा वायव्येला असावा त्याचे आउटलेटही याच दिशेला हवे.
 
विजेचा खांब व इतर उपकरणे : 
विजेचा खांब व ट्रान्सफार्मर आग्नेयेला असणे लाभदायक आहे. हा कोपरा पाण्याची टाकी, संडासासाठी वापरू नये. घरात इतर उपकरणांचे स्विच प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला असणे सोयीचे आहे, किंवा त्यांना कोणत्याही बाजूला लावू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धनप्राप्तीचे अत्यंत सोपे उपाय नक्की करून पहा