Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरात्र संपण्यापूर्वी दाराजवळ ठेवा या 6 वस्तू

नवरात्र संपण्यापूर्वी दाराजवळ ठेवा या 6 वस्तू
वास्तूमध्ये घर आणि दुकानाच्या दराचं विशेष महत्त्व असतं. म्हणून नवरात्रात देवीला खूश करण्यासाठी मुख्य दाराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. वास्तूप्रमाणे दाराजवळ या 6 वस्तू ठेवल्याने लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते आणि घरात पैसा येतो आणि घरातील व्यक्ती निरोगी राहतात.
* दारावर लक्ष्मीची पाउलं लावणे शुभ असतं. पाऊल घरात प्रवेश करत आहे असे मांडले पाहिजे.
 
* घरातील दारावर सुंदर आणि रंगीत तोरण बांधावे. तोरण आंबा किंवा अशोकाच्या झाडांच्या पानांचे असेल तर उत्तम. याने नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.

* नवरात्रीत मुख्य दाराजवळ एका बाऊलमध्ये पाणी घालून त्यात फुलं टाकावी. हे दाराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेकडे ठेवावं. याने कुटुंबातील मुखियाला फायदा होतो.
 
* घर किंवा दुकानाच्या मुख्य दरावर लक्ष्मी देवीचा फोटो लावावा ज्यात देवी कमळाच्या फुलावर विराजित असेल. असे केल्याने शुभ फल प्राप्त होतात.
webdunia

* दारावर ऊँ चिन्ह मांडा किंवा शुभ-लाभ लिहा. हे चिन्ह दाराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेकडे बनवावे. याने कुटुंबातील लोकं निरोगी राहतात.
 
* दारावर चांदीचे स्वस्तिक लावणे शुभ मानले गेले आहे. याने घरात आजार पसरत नाही. चांदीचे शक्य नसल्यास कुंकाने देखील स्वस्तिक मांडू शकता.
webdunia

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल (29.03.2017)