Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंदिरात कासव असण्याचे महत्त्व

मंदिरात कासव असण्याचे महत्त्व
श्रीविष्णूच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असणे 
कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. त्याला त्याच्यातील सत्त्वगुणामुळे ज्ञानही प्राप्‍त होत असते. या ज्ञानामुळेच त्याला `स्वत:ची कुंडलिनी जागृत व्हावी', अशी इच्छा निर्माण झाली. कासवाने श्रीविष्णूला प्रार्थना केल्यावर त्याने कासवाला मंदिरात गाभार्‍याच्या समोर स्थान प्राप्‍त होण्याचा आशीर्वाद दिला. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असते.

कासवाचे गुण

१. शरणागत भाव असणे : यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे संपूर्ण लक्ष देवतेच्या चरणांकडे असते.
२. सत्त्वगुण वृद्धीसाठी सतत प्रयत्‍नरत असणे : काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली असते. मान वर उचलणे, म्हणजे कुंडलिनी जागृत होणे व देवतेकडून प्रक्षेपित होणार्‍या सत्त्वलहरी ग्रहण करण्याची कासवाची धडपड दर्शवणे.
३. आध्यात्मिक उन्नती होण्याची तीव्र इच्छा असणे : आध्यात्मिक उन्नतीची तीका इच्छा असल्यामुळेच कासव मंदिरात कायमस्वरूपी रहाते.

कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा भावार्थ
कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ `कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्‍वराचे खरे दर्शन घडते', असा आहे. - ईश्‍वर

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आज तुमचा वाढदिवस आहे (23.08.2017)