साहित्य-
100 ग्राम हरभरे ,25 ग्राम वाटाणे,1 मध्यम आकाराचा कांदा,2 हिरव्या मिरच्या,चिमूटभर उडीद डाळ,कडीपत्ता,1 चमचा लिंबाचा रस,2 चमचे तेल,चिमूटभर मोहरी,चिमूट भर खायचा सोडा,मीठ चवीप्रमाणे,1 /4 कप शेव.कोथिंबीर.
कृती-
चमचमीत चणा चाट बनविण्यासाठी सर्वप्रथम हरभरे 5ते 6 तास भिजत घाला.चिमूटभर मीठ आणि खायचा सोडा घालून कुकर मध्ये शिजायला ठेवा.वाटाणे गरम पाण्यात एक दोन उकळी घेतल्यावर गॅस बंद करून त्यातील पाणी काढून घ्या.कांदा आणि मिरच्या बारीक चिरून घ्या.
तेल तापत ठेवा आणि त्यात मोहरी,उडीद डाळ,कडीपत्ता,मिरच्या घालून परतून घ्या. या मध्ये कांदा तांबूस रंगाचा होई पर्यंत परतून घ्या.आता उकडलेले हरभरे,वाटाणे या मध्ये घालून मीठ,लिंबाचा रस,कोथिंबीर,घालून चांगले हलवून घ्या.वरून शेव घालून सर्व्ह करा आणि कुटुंबासह हरभरा किंवा चणा चाट चा आस्वाद घ्या.