साहित्य -
1 /2 कप मुगाची पिवळी डाळ, 1 /2 कप ओट्स, 2 चमचे ताजे दही, 3 चमचे किसलेला कांदा, 1/2 चमचा बारीक चिरलेली हिरव्या मिरच्या, 2 चमचे चाट मसाला, 2 चमचे तिखट, 1/4 चमचा गरम मसाला, 1/4 चमचा हळद, 1 चमचा आलं -लसूण पेस्ट, 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीपुरती, 2 चमचे तेल.
कृती -
सर्वप्रथम पिवळी डाळ स्वच्छ करून 1 कप पाण्यात उकळून घ्या. या डाळीचे पाणी आटवून घ्या. आता या डाळीला मिक्सरमध्ये जाडसर पेस्ट वाटून घ्या.
या पेस्टला एका भांड्यात काढून घ्या. सर्व साहित्य घालून मिसळून घ्या. आता या गोळ्याला हातावर गोल टिक्कीचा आकार द्या.
आता एका पॅन मध्ये थोडं तेल टाकून या टिक्किना पॅनमध्ये सोडा. दोन्ही बाजूने तपकिरी रंग येई पर्यंत परतून घ्या. आरोग्यवर्धक आणि स्वादिष्ट ओट्स टिक्की तयार. हे आपण चमचमीत हिरव्या चटणी सह सर्व्ह करावे.