Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्त्री जागृति

सौ. स्वाती दांडेकर

स्त्री जागृति
ND
रात्र सरली झाली पहाट
आला सूर्य नभांगणी
टिमटिमते तारे हरवले रात्रीचे
चंद्र लोपला नभांतरी
सूर्याची लालीमा स्वागत करते नव दिसवांचे
पसरूनी किरणांची फुलझडी।।1।।

पक्षाची किलबिल सुरू झाली
गाय वासरे हंबरती
मंदीराची घंटा निनाद करती
वृद्ध जनांची मंत्र जागृति ।।2।

स्वरूप जन जीवन सामान्याचे
रोज सुरू होते रोज संपते
युगांन युगा पासून हीच पद्धती ।।3।।

मी जागृत करते स्त्री सखी तुजला
संपव निद्रा सुप्तावस्थेची
कर झंकृत तार आपुल्या बुद्धिमत्तेचे
निनादून दे ही वसुंधरा सारी ।।4।

webdunia
ND
दे जाणीव आपुल्या शक्तिची
कर सामना ह्या जगाचा
कशास घाबरते सर्वांशी
तू तर वंशज राणी लक्ष्मीची ।।5।।

तोडुन टाक बंधने सारी
जे देतात कष्ट तुजला
तोडुन टाक जाळे अपशब्दांचे
जे सोसले तु नि:शब्द पणे ।।6।

ये कोंदणीच्या जीवनातुन बाहेर तू
निश्चल, निर्मल जगात स्वागत तुझे
पुसुन टाक वेदना तन मनाच्या
ज्या कोरल्या अंत:करणी
घे हाती शस्त्र शिक्षणाचे
देईल आवरण हे तुजला आत्मरक्षेचे ।।7।।

ठेव विश्वास मनी तुझ्या
संपली रात्र तुझ्या यातनेची
उमेदीचा उष:काळ झाला नभी
प्रगतीचा पथ लाभो तुजला
आशा किरणांची हिरवउ रे ।।8।

यश कीर्तीचा सूर्य चमको
तुझ्या भाग्य नभी
हेच मागते देवा पाशी
ठेव कीर्ति कायम आमची
कारण मी पण तुझी सखी सोबती ।।9।।

Share this Story:

Follow Webdunia marathi